बोईसर-डहाणू, पालघर-विक्रमगड विधानसभेतील जिल्हाप्रमुख जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बोईसर, डहाणू आणि पालघर जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बोईसर आणि डहाणू विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी राजेंद्र (राजू) पुरुषोत्तम पाटील यांची तर पालघर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी विकास जगन्नाथ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पंकज देशमुख यांच्या कार्यक्षेत्रात आणखी 92 बूथ

बोईसर विधानसभा क्षेत्रात वसई तालुक्यातील 92 बूथ समाविष्ट करण्यात आले होते. वसई हे महानगरपालिका क्षेत्र असल्याने या 92 बूथचा समावेश आता वसई-नालासोपारा विधानसभा क्षेत्रात करण्यात आला असून हे सर्व बूथ शिवसेना वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या कार्यक्षेत्रात असतील, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.