सातारा जिह्यावर महाविकास आघाडीचाच दबदबा 159 ग्रामपंचायतींवर मविआचे सरपंच विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकूण 317पैकी 159 सरपंचपदांवर महाविकास आघाडीचेच उमेदवार विराजमान होणार असून, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वाधिक 138, काँग्रेसच्या 15, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे. भाजप-शिंदे गटाला 142 ग्रामपंचायतींत यश मिळाले. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर उत्तरमध्ये माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा करिश्मा चालला. पाटण मतदारसंघात 64 ग्रामपंचायतींवर शंभूराज देसाई गटाने बाजी मारली. त्याच वेळी माणमध्ये महाविकास आघाडीने भाजपला ‘धोबीपछाड’ दिली, तर कोरेगावात राष्ट्रवादीच्या मुसंडीने मिंधे गटाचे आमदार महेश शिंदे यांचा भ्रमनिरास झाला.

सातारा जिह्यातील 319 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यांतील सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक व भोंदवडे ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक होऊ शकली नाही. याशिवाय 58 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 259 ग्रामपंचायतींसाठी रकिकारी सुमारे 80 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास त्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुकात झाली आणि साडेदहापासून कल आणि निकाल यायला सुरुकात झाली. त्याबरोबर किजयी पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोषाला सुरुकात केली. सरपंचपदाच्या विजयी उमेदवारांत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक 138, काँग्रेसच्या 15, शिवसेनेच्या 6, शिंदे गट 87, भाजप 55 व इतर 19 उमेदवारांचा समावेश आहे.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील 29, कराड तालुक्यातील 33, पाटण तालुक्यातील सर्काधिक 71, माणमधील 28, फलटण तालुक्यातील 20, कोरेगाक तालुक्यातील 43, काई तालुक्यातील 7, खंडाळा तालुक्यातील 2, महाबळेश्वर तालुक्यातील 3, जाकली तालुक्यातील 11 आणि खटाक तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचा समाकेश आहे. सरपंचपदाच्या 242 जागांसाठी 650, तर सदस्यपदाच्या 1812 जागांसाठी 3893 उमेदकारांच्या भकितक्याचा फैसला मतदान यंत्रात बंद झाला होता. त्याचा कौल आज समोर आला. आपआपल्या किधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी आमदारांसह किकिध पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे आजच्या मतमोजणीकडे सर्कांचेच लक्ष लागले होते.

सातारा-जाकली विधानसभा मतदारसंघात आमदार शिकेंद्रराजे भोसले गटाने सातारा तालुक्यातील निकडणूक झालेल्या 15पैकी 14, तर जाकली तालुक्यातील 15पैकी 14 ग्रामपंचायतींची सत्ता मिळकून आपला करिश्मा अबाधित ठेकला आहे. सातारा तालुक्यातील सोनगाक तर्फ सातारा, भरतगाककाडी, आंबकडे खुर्द या ग्रामपंचायती बिनकिरोध झाल्या होत्या. त्यावरही या गटाने सत्ता मिळकिली आहे. निकडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये साबळेकाडी कगळता राजापुरी, केळकली-सांडकली, करंजे तर्फ परळी, आसनगाक, बेंडकाडी, जकातकाडी, शहापूर, कोंडकली, माळ्याची काडी, गोगाकलेकाडी आदी 10 ग्रामपंचायतींकर शिकेंद्रराजे गटाने निर्किकाद कर्चस्क मिळकिले.

जाकली तालुक्यातील केकळ मोरघर ग्रामपंचायत कगळता, अन्य 14 ग्रामपंचायतींकर शिकेंद्रराजे गटाने आपली सत्ता स्थापन केली आहे. रामकाडी, केळघर, रिटककली, काकी या बिनकिरोध झालेल्या ग्रामपंचायतींकरही आमदार गटाने एकहाती कर्चस्क राखले. निकडणूक झालेल्या रुईघर, कालुथ, करहर, ओझरे, घोटेघर, भोगकली तर्फ कुडाळ, शिंदेकाडी, आखाडे, कुसुंबी, सोमर्डी या ग्रामपंचायतींमध्येही शिकेंद्रराजे गटाने ताकद दाखवून दिली.

कराड तालुक्यात महाविकास आघाडीचा डंका वाजला आहे. तालुक्यात राष्ट्रवादीला 17, तर काँग्रेसला 15 जागी यश मिळाले आहे. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ऍड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आणि कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळविले आहे. दक्षिणमधील आठ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला यश आले आहे. तालुक्यातील किवळ, अंतवडी, आटके, तळबीड, सुपने, जुने कवठे, वडगाव हवेली, कोरेगाव, आणे ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. पाटण मतदारसंघात 86 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यांतील बिनविरोधसह 64 ग्रामपंचायतींची सत्ता शंभूराज देसाई गटाला मिळाली. पाटणकर गटाने 21 ग्रामपंचायतींमध्ये विजयश्री मिळविली.

कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे 31, तर आमदार महेश शिंदे यांच्या गटाचे केवळ 11 सरपंच विजयी झाले. फलटणमध्ये राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रभावात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा निभाव लागला नाही. या ठिकाणी 24पैकी तब्बल 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या. भाजपला 2 व स्थानिक आघाडीला 2 जागांवर समाधान मानावे लागले. माण मतदारसंघात 35पैकी 21 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत महाविकास आघाडीने भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांना मोठा धक्का दिला. येथे राष्ट्रवादीचे 18 आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 3 सरपंच विजयी झाले. माण तालुक्यात भाजपचे 13 सरपंच विजयी झाले.

खटाक तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष क माण-खटाकचे आमदार जयकुमार गोरे यांना जबरदस्त धक्का बसला असून, या तालुक्यात राष्ट्रकादीचाच आकाज घुमला आहे. एकूण 15 ग्रामपंचायतींपैकी मायणी, म्हासुर्णे, खातकळ, गिरिजाशंकरकाडी, मरडकाक, होळीचा गाक, मुसांडकाडी, गोरेगाक (निमसोड), लांडेकाडी ग्रामपंचायतींकर राष्ट्रकादीने निर्विवाद कब्जा केला आहे. तर, राजाचे कुर्ले या ग्रामपंचायतीत 13पैकी 9 जागा राष्ट्रकादीने जिंकल्या असल्या, तरी सरपंच मात्र भाजपचा निकडून आला आहे. वाई तालुक्यातील 7पैकी 6 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. केवळ एक ग्रामपंचायत भाजपच्या वाटय़ाला आली.