
मंगेश वरवडेकर
दोन वर्षांच्या कोरोनाच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा एकदा सुसाट धावली. मुंबईच्या खालावलेल्या तापमानात मुंबईकर धावपटूंच्या उंचावलेल्या उत्साहाने मुंबई मॅरेथॉन जोरदार झाली आणि या मॅरेथॉनवर इथिओपियाच्या हेल लेमी आणि त्याच्या सहकाऱयांनी राज्य केले. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये दहापैकी सहा एकटय़ा इथिओपियाचेच होते तर महिलांच्या गटात तर दहापैकी नऊ क्रमांक त्यांच्याच खेळाडूंनी पटकावत मुंबई मॅरेथॉन आपली केली. हिंदुस्थानी गटात पुरुषांमध्ये थोनक्कल तर महिलांच्या गटात चावी यादवने बाजी मारली.
मुंबईत मॅरेथॉनच्या मार्गात अनेक विकासाची कामे चालू असल्यामुळे आज अनेक शर्यतींचे मार्ग बदलावे लागले होते. बदललेल्या मार्गाचा धावपटूंना फारसा त्रास झाला नाही. मात्र दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईकरांनी रोजच्या धावपळीतून वेळ काढत एक धाव मुंबई मॅरेथॉनसाठी लावली. आज मुंबई, मुंबई आणि मुंबईकरांच्याच स्पिरीटसारखी धावली.
इथून तिथून इथिओपियाच
मुंबईच्या मुख्य स्पर्धेचा पाठलाग केल्यावर पुन्हा एकदा नेहमीचेच चित्र दिसले. मॅरेथॉनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक वळणावर फक्त आणि फक्त इथिओपियाचेच धावपटू होते. अन्य देशांचे धावपटू त्यांच्या आसपासही दिसले नाहीत. इतके ते सुसाट होते. हिंदुस्थानी धावपटू तर पहिल्या पाच किमीच्या टप्प्यातच त्यांच्यापेक्षा एक किमी मागे पडले, जे अंतर शेवटी दोन किमीपेक्षा जास्त होते.
हिंदुस्थानी धावपटूंची समाधानकारक कामगिरी
यंदाही हिंदुस्थानी धावपटू आपल्या शर्यती नेहमीपेक्षा चांगल्या वेळेत पूर्ण करू शकले नाहीत. गतविजेता श्रीनू बुगथाला 2 तास 15 मिनिटांच्या आत शर्यत पूर्ण करायची होती, पण मुंबईच्या थंडीत त्याची वेळ खालावली. त्याने 2 तास 23 मिनिटांत शर्यत पूर्ण केली तर गोपी थोनक्कलने सर्वांना धक्का देत 2 तास 16 मिनिटे आणि 46 सेपंदांत शर्यत पूर्ण केली आणि त्याने अव्वल स्थानही पटकावले. महिलांमध्येही पाचवे जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱया सुधा सिंगला शर्यतही पूर्ण करता आली नाही. त्यामुळे 2 तास 50 मिनिटे वेळ देत चावी यादव पहिली आली.
लेमी नॉनस्टॉप
इथिओपियाच्या हेल लेमीने पहिल्या किमीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. तो आणि त्याचे सहकारी 10 ते 12 खेळाडूंच्या जथ्याने सुरुवातीचे 20 किमी धावले. त्यांच्या या एकीबद्दल त्यांचे काwतुक करावे तितके कमी आहे. मात्र पुढे या जथ्यात लेमीने नॉनस्टॉप आघाडी घेतली. त्याच्यात आणि केनियन फिलमन रोनो यांच्यात 300 मीटर्सचे अंतर झाले. जे लेमीने कधीच कमी होऊ दिले नाही. टॉप टेनमध्ये यावेळी केनियाचे केवळ दोनच धावपटू स्थान मिळवू शकले. तर मोरोक्कोच्या अबिदा इजामजामीने सातवा क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे हिंदुस्थानी धावपटूंने टॉप टेनमध्ये धडक मारली. हिंदुस्थानचा गोपी दहावा आला.
मुंबई मॅरेथॉन 2023 चे निकाल
मॅरेथॉन एलिट (पुरुष)
1. हेल लेमी (इथिओपिया) 02ः07ः32
2. फिलमन रोनो (केनिया) 02ः08ः44
3. हैलू झेवडू (इथिओपिया) 02ः10ः23
4. अब्देला गोडाना (इथिओपिया) 02ः11ः31
5. ओकुबे टीसेगे (इथिओपिया) 02ः11ः49
6. आयच्यू बानती (इथिओपिया) 02ः11ः53
7. अबिदा इजामझामी (मोरोक्को) 02ः12ः36
8. मासरेषा बेअर (इथिओपिया) 02ः14ः56
9. जॉन लंगत (केनिया) 02ः16ः08
10. गोपी थोनक्कल (हिंदुस्तान) 02ः16ः41
मॅरेथॉन एलिट (हिंदुस्थानी पुरुष)
1. गोपी थोनक्कल (हिंदुस्तान) 02ः16ः41
2. मान सिंह (हिंदुस्तान) 02ः16ः58
3. कालिदास हिरवे (हिंदुस्तान) 02ः19ः54
4. अनिश थापा (हिंदुस्तान) 02ः22ः00
5. श्रीनु बुगठा (हिंदुस्थान) 02ः23ः05
मॅरेथॉन एलिट (महिला)
1. अंचल हेमनोत (इथिओपिया) 02ः24ः15
2. रहमा तुसा (इथिओपिया) 0224ः22
3. लेटेब्रहन हेले (इथिओपिया) 02ः24ः52
4. लेमेनेह कासु (इथिओपिया) 02ः28ः43
5. सिफान आलेमु (इथिओपिया) 02ः29ः22
मॅरेथॉन एलिट (हिंदुस्थानी महिला)
1. चावी यादव (हिंदुस्थान) 02ः50ः35
2. आरती पाटील (हिंदुस्थान) 03ः00.44
3. रेणू सिंह (हिंदुस्थान) 03ः01ः11
4. जिगमेट डोलमा (हिंदुस्थान) 03ः03ः31
अर्ध मॅरेथॉन (पुरूष)
1. मुरली गावीत (हिंदुस्थान) 01ः05ः20
2. अंकित देशवल (हिंदुस्थान) 01ः05ः48
3. दीपक पुंभार (हिंदुस्थान) 01ः05ः51
4. मोहन सैनी (हिंदुस्थान) 01ः07ः39
4. राज तिवारी (हिंदुस्थान) 01ः09ः03
अर्ध मॅरेथॉन (महिला)
1. पारूल चौधरी (हिंदुस्थान) 01ः15ः07
2. नंदिनी गुप्ता (हिंदुस्थान) 01ः24.12
3. पूनम सोनुने (हिंदुस्थान) 01ः24ः59
4. ताशी लाडोल (हिंदुस्थान) 01ः25ः28
4. स्टॅनझिन चोंडोल (हिंदुस्थान) 01ः26ः24
थोडे हटके…
बाळाला घेऊन आई धावली
मुळात धावण्याची आवड असलेल्या आणि अनेक मॅरेथॉन स्पर्धांत पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावणाऱया अवनी कल्याणी या पुणेकर आईने आपल्या दहा महिन्यांच्या बाळासह 3 तास 45 मिनिटांत अर्ध मॅरेथॉन पूर्ण करण्याचे धाडस दाखवले. ती आपल्या बाळाला छातीला बांधून धावली. विशेष म्हणजे या शर्यतीदरम्यान बाळाला भूक लागणार याची कल्पना असल्यामुळे तिने सोबत वेलची केळेही ठेवले. होते. या शर्यतीचा बाळानेही इतका जबरदस्त आनंद घेतला की तो पूर्ण शर्यतीत कुठेही रडला नाही आणि त्याने आईची शर्यत वेळेत पूर्ण होऊ दिली. अवनीचा नवरा सतेज कल्याणी यानेही आज मॅरेथॉन सहजरीत्या पूर्ण केली.
मुंबईकरांचा उत्साह वाढला…
दोन वर्षांनी मुंबईत मॅरेथॉनने पुनरागमन केल्यामुळे हजारो धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी कुडकुडायला लावणाऱया थंडीतही मुंबईकर पहाटे उठले होते आणि ते धावपटूंना धावा धावा म्हणून प्रोत्साहन देत होते. नेहमीप्रमाणे पेडर रोड, हाजी अली, वरळी परिसरात नागरिक मोठय़ा संख्येने आपापल्या बिल्डिंगच्या खाली धावपटूंना पाणी, ज्यूस, फळे आणि बिस्कीटचा पुरवठा करताना दिसत होते.
बीबी सताये तो हमे बताए…
मॅरेथॉन शर्यतीदरम्यान अनेक सामाजिक संस्थांच्या कल्पकतेला उधाण आलेले असते. यावेळीही अनेक संस्थांनी कल्पकरीत्या सामाजिक विषयांचे फलक बनवले होते, पण मुख्य मॅरेथॉनच्या गेट बाहेर दहा-पंधरा तरुणांच्या गटाने ‘बीबी सताये तो हमें बताए’ हा भन्नाट फलक बनवून सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीने घोषणा देत होते ते पाहून पुरुष मंडळी त्यांच्यासोबत आवडीने पह्टोही काढत होते आणि हसतखेळत आपले दुःखही सांगत होते. आणि त्यांची जाहिरातबाजी पाहून बायकाही ‘उन्हें हमसे कोई बचा नहीं पायेगा’ म्हणून त्या संस्थेला टोमणे मारून हशा पिकवत होत्या.
लवकर पळा, आगे टोल फ्री है…
मुंबईकरांनी आज मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. जागोजागी स्वयंसेवक आपापल्या परीने धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी मस्त अशी घोषवाक्यं बोलत होती. अशीच एक महिला वरळी सी लिंक टोलनाक्याच्या आधी संत्र्याच्या पह्डी देत म्हणत होती, ‘लवकर पळा, आगे टोल फ्री है… नहीं तो टाइम खतम हो जाएगा.’ आज नेहमीप्रमाणे सी लिंकवर वाहने धावली नाही, पण त्यांच्याऐवजी धावलेल्या तब्बल 30 हजार धावपटूंकडून कोणताही टोल आकारला गेला नाही.
मुंबई सुस्साट धावली!
दोन वर्षांच्या कोरोनाच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा एकदा सुसाट धावली. कडाक्याच्या थंडीतही अफाट उत्साहात मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यंदाच्या मॅरेथॉनवर इथिओपियाच्या हेल लेमी आणि त्याच्या सहकाऱयांनी राज्य केले. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये दहापैकी सहा एकटय़ा इथिओपियाचेच होते तर महिलांच्या गटात तर दहापैकी नऊ क्रमांक त्यांच्याच खेळाडूंनी पटकावत मुंबई मॅरेथॉन आपली केली. हिंदुस्थानी गटात पुरुषांमध्ये थोनक्कल तर महिलांच्या गटात चावी यादवने बाजी मारली.





























































