
>> चंद्रहास रहाटे
आयुष्यभर काम करून निवृत्तीनंतर वृद्धापकाळात कुणावर अवलंबून राहायची वेळ कुणावर येऊ नये. दुसऱ्यासमोर हात पसरण्यापेक्षा जर दुसऱ्यांना देण्याची ऐपत निर्माण झाली तरच आपला सेल्फ रिस्पेक्ट टिकून राहू शकतो आणि दुसऱ्यांना जरी नाही देता आलं व स्वतःचे खर्च जरी भागवता आले तरीही खूप झालं.
निवृत्ती नियोजनासाठी आपल्याला खूप उशिरा जाग आली तर खूप मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लांब दिसणाऱ्या ध्येयासाठी लवकरात लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. वेळ हातातून निघून गेली तर हताश राहण्यापलीकडे आपल्या हातात काही उरत नाही
निवृत्ती नियोजन करताना आपले आजचे खर्च महागाई वाढल्यामुळे निवृत्तीवेळी किती होतील व ते खर्च पुढे वयाच्या कमीत कमी नव्वदीपर्यंत मिळण्यासाङ्गी किती निधी उभारायला लागेल याचे समीकरण मांडणे गरजेचे आहे.
निवृत्तीचे नियोजन करताना अनेक पर्यायांचा विचार होतो. यामध्ये घर किंवा दुकान खरेदी करून त्यावर मिळण्याच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळविण्याचा पर्याय बरेच जण स्वीकारतात. भाडय़ाच्या या पर्यायामध्ये उत्पन्न वरखाली होण्याची शक्यतादेखील असते.
त्याचप्रमाणे निधी संकलित करून हमी नसलेल्या उत्पन्नाचादेखील पर्याय सर्वांसाङ्गी उपलब्ध असतो. यात प्रामुख्याने गुंतवणुकीवरचे व्याज व डिव्हिडंड या उत्पन्नाचा समावेश असतो. व्याजदर निश्चित नसल्यामुळे व डिव्हिडंड पंपनीच्या नफ्यावर अवलंबून असल्यामुळे यातदेखील उत्पन्न वरखाली होण्याची शक्यता असते.
पॅसिव्ह व हमी असलेल्या उत्पन्नाच्या पर्यायामध्ये येणारे उत्पन्न गॅरेंटेड असते. उद्या व्याजदर खाली गेले किंवा वर गेले तरी आपल्याला सांगितलेले उत्पन्न कधीच कमी होत नाही. या पर्यायामध्ये पेन्शन प्लॅन्स व
अॅन्युटी या पर्यायांचा समावेश असतो. आतापर्यंत चर्चा केलेले उत्पन्नाचे सर्व पर्याय वार्षिक उत्पन्नामध्ये धरले गेल्यामुळे आपल्या इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे कर आकारणी होते. डिव्हिडंड या पर्यायात डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन
टॅक्स आधीच आकारला जातो.
पॅसिव्ह व हमी असलेल्या उत्पन्नाच्या पर्यायामध्ये ज्या पॉलिसीचा प्रीमियम विम्याच्या रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मात्र येणारी वार्षिक रक्कम ही करमुक्त असते, पण नवीन टॅक्स तरतुदीनुसार 1 एप्रिल 2023 नंतर ज्या पॉलिसीचा प्रीमियम 5 लाखांपेक्षा जास्त असणार त्याचे उत्पन्न टँक्सेबल होणार आहे. 31 मार्च 2023 पूर्वी 5 लाखांच्या वर प्रीमियम असलेल्या सर्व पॉलिसींचे मिळणारे आजन्म उत्पन्न करमुक्त राहणार आहे.
अजून एका निश्चित पर्यायाचा उल्लेख मला करावासा वाटतो, तो म्हणजे एस. डब्लू. पी. प्लॅन म्हणजेच सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. या प्लॅनमध्ये बॅलन्स फंडमध्ये निधी गुंतवून साधारण 6 टक्के वार्षिक रक्कम महिन्याला घेता येते. गुंतवणुकीवर 12 टक्के व्याज मिळाले तर हा पर्याय उपयोगी होऊ शकतो, पण हा पर्याय शेअर मार्केट गुंतवणुकीवर अवलंबून आहे.
आपल्या खर्चाच्या साधारण 40 टक्के भाग हा निश्चित खर्चाचा असतो. हा खर्च आपण टाळूच शकत नाही. अन्न, वस्त्र्ा व निवाऱ्याचा मेंटेनन्सचा खर्च करावाच लागतो. या खर्चाची तरतूद जर पॅसिव्ह व हमी असलेल्या पर्यायाने जर करता आली तर आपली मानसिक शांती टिकवता येऊ शकेल. उरलेला 60 टक्के खर्च हा आपल्या वाढीव राहणीमानावर अवलंबून असल्यामुळे अॅडजस्ट करता येऊ शकतो. त्यामुळे त्याची तरतूद हमी नसलेल्या उत्पन्नावर केली तरीही चालू शकते.
अशा पद्धतीने तरतूद केलेल्या पर्यायांच्या निवृत्तीच्या नियोजनासाङ्गी उपयोग होऊ शकतो. आपला आत्मसन्मान जर टिकवायचा असेल आजच निवृत्ती नियोजनाचे रोप लावायला हवे. तर आणि तरच निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची मधाळ फळे आपल्याला चाखायला मिळू शकतील.
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत)


























































