त्या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतच तयार झाली – छगन भुजबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या फुटीची स्क्रिप्ट दिल्लीतच तयार झाली आहे, असे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव देखील पुढे केले होते, असेही त्यांनी सांगितले.

”एकनाथ शिंदे व इतर आमदार शिवसेनेतून फुटून गेले. या घटनेची स्क्रिप्ट ही दिल्लीतच तयार झालेली होती. दिल्लीकरांकडेच अशा प्रकारचं कौशल्य आहे. त्यामुळे तेच अशा घटना घडवून आणतात. यावर आता महाराष्ट्राची जनता काय म्हणते ते बघू”, असे छगन भुजबळ म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलेलं

जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनणार हे निश्चित झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांचं नाव पुढे केलं होतं, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.