
>>जयश्री संगीतराव
आयुष्यभर हृदयाच्या कोपऱयात भळभळणारी जखम घेऊन जगलेली कुरू कुळातील अतिशय करारी, संवेदनशील अशी व्यक्तिरेखा म्हणजे पुंती. खरं तर राजकन्या, राजाज्ञी, राजमाता असूनही तिचे आयुष्य जन्मापासूनच वेगवेगळ्या वळणावर हेलकावे खात राहिले.
लहान वयात दुर्वासांसारख्या कोपिष्ट ऋषीची सेवा करण्याची वेळ पुंतीवर आली. त्यांनी दिलेला वर अमलात आणताना काwमार्यातच पुत्रप्राप्ती झाल्यामुळे आयुष्यभर झालेला मनस्ताप. पुत्राची ओळख पटल्यानंतरही त्यांनी तिचं मातृत्व स्वीकारलं, पण जगजाहीरपणे तिला माता म्हणण्यासाठी नकार दिला. काय वाटलं असेल एका मातेला?
तिचं मन म्हणत असेल…
चंदेरी पेटीत जेव्हा, कर्ण माझा मी ठेवला
मातृत्वाच्या भावनेचा, अवमान बाळा मीच केला
गौण मजला राजसौख्य फिकी सारी,
फिकी सारी सुखे
अभागी मातेचं काळीज हे कर्णा, तुझ्यासाठीच दुखे
काwरव-पांडवांच्या युद्धाची सांगता झाली होती. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. सारा आसमंत आसवांनी आणि हुंदक्यांनी भरला होता. युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांना तिलांजली देण्यासाठी धर्मराज बसला होता. नकळत मी उठले. माझे पाय त्या दिशेला आपोआप चालू लागले. मनात वर्षानुवर्षे दाबून ठेवलेला भावनांचा डोंब उसळला होता. बरंवाईट सारं सारं कळण्याच्या पलीकडे मी पोहोचले होते. धर्मराजाच्या समोर येऊन मी उभी राहिली अन् मुखातून शब्द बाहेर पडले…‘‘ङ्खबछूछ आणखी एक तिलांजली दे तुझा ज्येष्ठ भ्राता अंगराज कg्ङ्गछसछठह्र.ङ्ग’’ त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. त्याची नजर मला वाचता येत होती. मी कशीबशी उत्तरले,‘‘हो, तो माझाच ज्येष्ठ पुत्र आहे विवाहापूर्वीचा. तुझा ज्येष्ठ भ्राता.’’ पाचही भावंडांच्या डोळ्यांत न बोलताच प्रश्नचिन्ह दिसत होतं, ‘‘हे आम्हाला आधी का बोलली नाहीस माते ? मी अवघं राज्य त्याच्या पायावर घातलं असतं.’’ हे युधिष्ठराचे शब्द मी कसेबसे ऐकले. माझं मन केव्हाच भूतकाळात जाऊन पोहोचलं होतं. यादव कुळातल्या राजा शिवसेनाची मी पृथा, निःसंतान पुंती भोज राजाची कन्या बनले. हस्तिनापूरच्या सम्राटाची पत्नी, शूर-पराक्रमी पांडवांची माता, हस्तिनापूरची राजमाता. गेली 50 वर्षे माझ्या गळ्यात विविध रंगीत पट्टा घालून काळाने मला त्याच्या तालावर फिरवलं आहे. माझं जीवन म्हणजे जरीकाठी तलम राजवस्त्र्ा, परिस्थितीच्या निर्दयी काटेरी पुंपणाने त्याच्या सहस्र चिंध्या केल्या होत्या. पुंती म्हणून मी एक दिवसही जगले नाही. नशिबी राजयोग होता, पण राजाभोग नव्हता हेच खरं. पुंती भोजाकडे आलेल्या दुर्वास ऋषींच्या यज्ञाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. कुमार अजाण वय, तामसी महात्म्याची मर्जी राखू शकेन का? मनात असंख्य विचार होते. जीव घाबरा झाला होता, पण माझ्या पुण्याईने असेल कदाचित, मी त्यांच्या विश्वासावर खरी उतरले. मोठय़ा श्रद्धेने, निष्ठsने मी ती जबाबदारी पार पाडली. ऋषींनी खुश होऊन मला वर दिला. दिलेला मंत्रोच्चार करून तू ज्या देवतेचं स्मरण करशील त्या देवतेसारखा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. अल्लड वय… एकदा असंच प्रकाशणाऱया तेजस्वी सूर्याला बघून त्या वराची सत्यता पडताळून बघण्याचा मोह झाला. मंत्र उच्चारताच साक्षात सूर्यनारायण समोर उभे ठाकले. मी घाबरले, घामाने डबडबले. त्यांना परत जाण्यास विनवू लागले, पण ते कसे शक्य होते? मला मिळालेला मंत्र आपलं काम करून गेला होता. कुमारी माता होण्याचा प्रसंग माझ्यावर आला. यथावकाश बाळंत झाले. जन्मजात सोनेरी कवचपुंडले असणाऱया तेजस्वी सूर्यपुत्राला मी जन्म दिला. समाजाच्या भीतीने धात्री दासीच्या मदतीने चंदनाच्या पेटीत विपुल धन आणि अलंकार ठेवून माझ्या बाळाला पहिलं व शेवटचं कुशीत घेऊन जड हाताने त्याला मी पेटीत ठेवलं. अश्व नदीच्या कुशीत त्या पेटीला सोपवलं.
दैव कसं असतं बघा. बालपणी हिरवळीवर पडलेल्या चंडोल पक्ष्याच्या पिलाला त्याच्या आईकडे सोपवण्याचा हट्ट करणारी पृथा आपल्या काळजाच्या तुकडय़ाला, रक्तामांसाच्या गोळ्याला आपल्यापासून दूर करत होती. काळ पुढे सरकत होता. हस्तिनापूरच्या सम्राटाशी विवाह झाला. शापित पती, दुर्वास ऋषीकडून मिळालेला वर आता आमच्या संसाराला ईश्वरी वरदान ठरला. पांडवांची माता बनण्याचा मला मान मिळाला. एकाहून एक पराक्रमी पुत्र पोटी जन्मले, पण भाग्यात वनवास होताच. आपापसातील वैर, द्वेष यातून माझ्या पुत्रांना मिळालेला वनवास, त्यांना जिवे मारण्यासाठी केलेली कटकारस्थानं, पुत्रवधूची भर दरबारात झालेली अवहेलना… सारं काही मी मूकपणे सहन करत होते. पतीचा वियोग तर आधीच पदरात पडला होता. पुत्रांचा पराक्रम हीच काय ती जगण्याची उमेद होती.
गुरू द्रोणाचार्य अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून घोषित करणार होते. माझं मन आनंदाने डोलत होते. तेवढय़ात एक तेजस्वी युवक त्याला शह देण्यासाठी प्रतिस्पर्धी म्हणून दाखल झाला. त्याची सोनेरी कवचपुंडलं बघून मला भोवळच आली. गंगा, यमुना, सरस्वती व अश्व नदीच्या पात्रात वाढलेलं माझं ते कमळ होतं. मला त्याला गोंजारायचं होतं. आलिंगन द्यायचं होतं. मी त्याला डोळे भरून बघतच राहिले. तेवढय़ात त्याला पुन्हा ‘सुतपुत्र’ म्हणून हिणवलं गेलं. माझ्या कानात जणू कोणीतरी गरम शिशाचा रस ओततंय असं वाटलं. ओरडून सांगावंसं वाटलं, नाही तो ज्येष्ठ पांडव आहे. पुंतीपुत्र आहे. माझं पहिलं बाळ आहे, पण मी हस्तिनापूरची राजमाता. माझ्या लौकिकाने मला जगायलाच पाहिजे. माझं मातृत्व पुन्हा एकदा डावावर लागलं होतं. माझ्या दुर्दैवाने पुन्हा एकवार डाव टाकलाच. दुर्योधनाने कर्णाला अंगराज बनवलं. त्याच्या उपकारांची परतफेड तो आपल्या भावांशी वैर करून करत होता का? ज्याची मला भीती होती तेच घडत होतं. काwरव-पांडव युद्ध उभं ठाकलं. माझाच ज्येष्ठ पुत्र त्याच्या लहान भावांच्या जीवावर उठणार? की अर्जुनाचा शर आपल्या वडील भ्रात्याचा जीव घेणार? विचारांचा भुंगा स्वस्थ बसू देत नव्हता. काय करावं? त्याला त्याचं जीवनरहस्य सांगून परावृत्त करावं का? माझ्या मनातली घालमेल कृष्णाला कळली? त्यानेही सत्य सांगून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण वचनाचा पक्का असलेलं माझं बाळ कर्तव्याकडे कशी पाठ फिरवणार? मीच मग शेवटचा उपाय करून बघायचं ठरवलं. माझं मातृत्वच लावलं डावावर? त्याचं जीवनरहस्य, माझी अगतिकता…सारं सारं काही आडपडदा न ठेवता कथन केलं. मला माझे सगळेच पुत्र जीवित हवे आहेत. तुम्ही एकमेकांचा जीव घेतलात तर या मातृहृदयाला कसं सहन होणार? वारंवार त्याला विनवू लागले, पण पुन्हा त्याची कर्तव्यनिष्ठता सिद्ध झाली. तो आपल्या निश्चयापासून तसूभरही ढळला नाही, ना त्याचा निर्धार! माते, माझं युद्ध फक्त अर्जुनाशी असेल. आम्हा दोघांपैकी कोणीही धारातीर्थी पडला तरी तू पाच पुत्रांची माता राहशीलच. पुन्हा हरलं ते माझं मातृत्वच. रिकाम्या हाताने मी परत आले. उघडय़ा डोळ्यांनी, जड अंतःकरणाने सारा विध्वंस बघत राहिले. माझ्या ज्येष्ठ पुत्राचा अंत झाल्यावरही मी उघडपणे शोक करू शकले नाही. मूकपणे अश्रू ढाळत राहिली ही माता पृथा, पण शेवटी निश्चय केला, त्याला त्याचे रक्ताचे आप्त आहेत. त्याच्या भ्रात्याकडून त्याला तिलांजली मिळायलाच हवी. सारा संकोच, सारी बंधनं तोडून त्या दिवशी मात्र माझं मातृत्व पुढे सरसावलं. मनात विचार आला, हीच हिंमत मी पूर्वीच दाखवली असती तर? तर कदाचित कुरू कुलाचं चित्र वेगळंच राहिलं असतं. माझा मूकपणा, अबोलपणा, माझा भीडस्त स्वभावच महाभारत घडविण्यास कारणीभूत झाला नसेल ना? हे शल्य मनात ठेवून जड अंतःकरणाने ही पुंती धृतराष्ट्र व गांधारीबरोबर वानप्रस्थानाकडे निघाली, पण शेवटच्या श्वासापर्यंत मन म्हणत होतं…
कीर्तीने गाजले पांडव जरी महाभारती,
कर्णाविना अधुरी
माता पृथ्वा की पुंती!





























































