सेलेब्रिटी चॉइस – जगण्याचा तळ शोधणारं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिलिंद शिंदे

पुस्तक वाचणं माझ्यासाठी नेहमी नवा अनुभव असतो. मग ते पुस्तक कोणतंही असलं तरी चालतं. कुणीतरी सुचवलेलं, एखादं अवचित हातात आलं आणि आवडलेलं तर कधी वाचलेलंच पुस्तक पुन्हा वाचावंसं वाटणं असा पुस्तकांचा माझ्या हाती येण्याचा प्रवास असतो. शूटिंगच्या शिफ्टमधला, कधी प्रवासातला तर कधी मुद्दाम ठरवून काढलेला वेळ या सगळ्यात पुस्तपं असतातच अवतीभवती. त्यांची साथसोबत अभिनेता, कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून मला घडवणारी असते.

कायम वाचावी असं वाटणाऱया पुस्तकांत जीएंच्या कथांचा, पुस्तकांचा नंबर अगदी वरचा आहे. त्यांची रमलखुणा, हिरवे रावे, रक्तचंदन, निळासावळा, सांजशकुन ही सगळीच पुस्तपं आवडीची आहेत. त्यात नुकतंच वाचलेलं पुस्तक म्हणजे डोहकाळिमा. त्याबरोबरच विजय तेंडुलकर यांची सर्व नाटपं, पुस्तपं पुन्हा पुन्हा मी वाचतो. कारण त्यांचा प्रभाव कालातीत राहणार आहे. एक अभिनेता, कलाकाराच्या दृष्टितून त्यांचं लिखाण जितपं भावतं तितपंच वाचक म्हणूनही. तेंडुलकरांनी गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल या त्यांच्या साहित्यातून जे सामाजिक वास्तव मांडलं आहे तेच एका वेगळ्या नजरेतून, प्रतलातून पुढे सतीश आळेकर, महेश एलपुंचवार यांच्या लिखाणातून आपल्यासमोर  येतं. आळेकरांचं बेगम बर्वे, महानिर्वाण एलपुंचवारांची सुलतान ही एकांकिका आणि वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगान्त ही त्रिनाटय़धारा आजही पुन्हा वाचावी, बघावी अशी आहे.

गेल्या काही वर्षात अत्यंत आवडीने वाचलेली पुस्तपं म्हणजे दंशकाल, काळजुगारी, फोल्डिंगचा माणूस परफेक्टची बाई, घनगर्द. यातही विशेष आवडलं पुस्तक दंशकाल. या पुस्तकाने मला अक्षरश: झपाटून टाकलं. केवढा मोठा आलेख आहे या कथानकाचा. लेखक ह्षीकेश गुप्ते यांच्या या पुस्तकाने मला अक्षरश: खिळवून ठेवलं. असंच आवडलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे राजन खान यांचं रस-अनौरस हे पुस्तक.

हल्ली नुकतंच वाचलेली आणि खूप आवडलेली कादंबरी अधिवास. बाबु बिरादार हे ज्येष्ठ कादंबरीकार.देगलूर तालुक्यातील हे प्रतिभावंत लेखक. त्यांच्या लेखनात आदिम संस्कृती, लोकपरंपरा, लोककथा आणि यासोबत विस्तारलेलं ग्रामीण जगणंच आपल्याला आढळतं. त्यांची अधिवास ही कादंबरी म्हणूनच खूप आवडली. त्यांची मातीखालचे पाय, कावड, संभूती, अंतŠपुरुष ही पुस्तपं आवर्जून वाचावीत अशी आहेत. असंच भावलेलं पुस्तक म्हणजे मनोज बोरगावकर यांचं नदीष्ट. असं काही वाचलं की खरंच पुस्तपं नसती तर आपण नेमक्या कोणत्या आनंदाला मुकलो असतो. जगण्याचा तळ शोधणारं असं हे पुस्तकांचं जग. या जगात गेलं की आपसूकच जगणं समृद्ध होणं म्हणजे काय याचा नेमका अर्थ कळतो.

(शब्दांकन: शुभांगी बागडे)