छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून राज्यात कोरोनाचे नवे रूग्ण सापडत आहेत. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

छगन भुजबळ सोमवारी येवल्याहून नाशिकला परतत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ असल्याचे जाणवले आणि त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असून ते नाशिक येथील घरी विश्रांती घेत आहेत.