Amritpal Singh अमृतपाल सिंग पंजाबमध्ये, सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला अटक करण्यासाठी देशभरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलिसांच्या या सर्च ऑपरेशनसाठी अनेक राज्यातील पोलीस मदत करत आहेत. दरम्यान अमृतपाल हा पंजाबमध्ये परतला असून तो आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

अमृतपाल हा होशियापूर येथून अमृतसरच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो तिथून थेट सुवर्ण मंदिरात जाणार असून तिथे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सुवर्ण मंदिरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अमृतपाल याच्यावर भडकावू आणि चिथावणीखोर भाषणे देण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 23 फेब्रुवारीला अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी अमृतसर येथील अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले होते. आज सकाळी अमृतपाल हा सहकाऱयांसह जालंधरच्या शाहकोटजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, अमृतपालने पळ काढला. पंजाब पोलिसांच्या 50 गाडय़ांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, पंजाब पोलिसांनी धडक कारवाई करत 76 जणांना अटक केली.