
>>शिरीष कणेकर
पुरुष बायकोला वाटतो तितका वाईट नसतो व आईला वाटतो तितका चांगलाही नसतो.
मला आईच नसल्यामुळे मी चांगला वाटू शकेन असं माणूसच देवानं जगात ठेवलं नाही. मग आता मी कोणाला चांगला वाटणार? निदान सदैव भावाची आईखालोखाल काळजी करते व भलं चिंतते अशी एखादी पाठीला पाठ लावून आलेली बहीण तरी द्यायची. तेही नाही. राखीपौर्णिमाही माझे मनगट ओकंबोकंच रहातं. माया करणारी, दिलाची तार जोडणारी, जगावसं वाटायला लावणारी दोन हक्काची माणसं देवानं मला नाकारली. पण बायको मात्र न चुकता, न विसरता दिली. बदमाश साला.
देवाशी माझा काही संबंध नाही. मी देवाला मानत नाही. मानत नाही म्हणजे देव नावाची गोष्ट नाहीच आहे, असा माझा मुळीच दावा नाही. असा दावा करण्यासाठी सखोल व्यासंग हवा. तो माझा नाही. मी एवढंच जाणतो की, देव असला तरी मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. कितीतरी माणसांना आपण ओळखत नसतो. तसा देवा मी ओळखत नाही. ओळखू इच्छित नाही. तो त्याच्या घरी (?), मी माझ्या घरी. न तुझसे दोस्ती अच्छी, न दुष्मनी अच्छी. ज्या मरण नाही तो देव आमचा कसा? नाही म्हणाया मी ढोपराएवढा असताना दर शनिवारी अण्णांबरोबर सायकावर डबलसीट पुण्यात भिकारदास मारुतीला जायचो. मी घरून भोकाच्या पैशांची माळ दोरीत वळून घेऊन यायचो. देवळाबाहेर आम्ही ती माळ सोडवायचो. तिथं ओळीनं बसोल्या भिकाऱयाच्या वाडग्यात मी वाकून वाकून एक एक भोकाचा पैसा टाकायचो. माझ्या पाठा रग लागायची. अण्णांचा आवाज कानावर यायचा, ‘मिस्टर शिरीष, पैसे संपले. भिकारीही संपले. चला घरी!’
आम्ही घरी जायचो. आई नसलेल्या व घरपण गमावलेल्या घरी. आम्ही मुंबईला आलो आणि देव मागे राहीले. की आम्ही जाणूनबुजून मागे ठेवले? ‘अण्णा’ ‘बाहेरचे परीक्षक’ म्हणून जयपूरला गेले होते. मी सोबत गेलो होतो. स्थानिक यजमान आम्हा जयपूरमधल्या भल्यामोठ्या गणपतीच्या देवळात घेऊन गेले. अण्णा शेवटपर्यंत नाही पण नाही आत आले. त्यांचा सौम्य नकार कडक होता. का नसतील आले अण्णा देवळात? त्यानंतर माझं देवळात जाणं का व कसं सुटलं माझ मलाचं कळलं नाही. माझा कसला राग नव्हता. देवाशी पंगा घेण्याइतका मी स्वत:ला मोठा व सामर्थ्यवान समजत नव्हतो. पण बस्स, हमने उससे नाता हमेशा के लिये तोड दिया था. मी मुलीला गोण्या मारुतीला घेऊन जायचो. पण देवळात गेल्याचं स्मरत नाही. कोणाबरोबर तरी शिरडीला गेलो होतो. त्यांच्यासह आतही जाऊन आलो. जसा कोरडा आत गेलो तसाच कोरडा बाहेर आलो. मला काहीही वाटलं नाही. मी साईभक्त झालो नाही. मा यत्किंचितही बरं वाटां नाही. साईबाबा माझी दुःखं दूर करतील या भलभलत्या विचारांनी माझ्या मनात घर केलं नाही. मी एखाद्या डासासारखा आत गेलो व डासासारखा बाहेर आलो. त्यानंतर खर्च करूनत्रास घेऊन अशा तीर्थक्षेत्री का जावं हेच मा कळेना, मी बंद केलं.
अलीकडे कधीतरी देवदूत माझ्या स्वप्नात येतो, पण मी त्या उभं करत नाही. त्याच्या देवा उभं करीत नाही तर त्या कशा उभं करू? मंत्र्या थारा द्यायचा नसा तर त्याच्या सेक्रेटरा का म्हणून ओंजारावं गोंजारावं?
देव क्षूद्र, वैयक्तिक वैर करतो? देवाचा न्याय म्हणतात तो खरोखरच नीरक्षीर, विवेकी न्यायनिवाडा असतो? की, तो करतो त्याच आपण न्याय म्हणायचं असतं? एकेका माणसाचं खातं बंद करून तो आटोपलेला ग्रंथ कुठे ठेवतो? कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तो का देत नाही? ही कसी मनमानी, अरेरावी व गुर्मी? हिंमत असा तर माझ्या समोर ये. मग मी कसा फावर घेतो ते बघ. मी त्या घाबरत नाही. तो आणखी वाईट करा या भीतीखी उरो श्वास घ्यायचे? वा रे वा! दहशतीचं साम्राज्य! दिसां देऊळ की घा दंडवत बाबा रे, काही चांगां कां नाहीस तरी चा; वाईट कां नाहीस म्हणजे मिळवी.
हाथों की ाकीरो से क्या देखते हो गीब
नसीब उनका भी होता है जिनके हाथही नही होते
वाचक मा विचारतात, का अशी निरवानिरवीची भाषा? उमेदीची भाषा कुठून आणू ते तरी सांगा म्हणावं.
मी पुण्यात टिळक रोडवरच्या शिशुविहार बाकवाडीत जायचो तेव्हा इतर मांच्या आया माझ्याकडे गढूळ नजरेनं पहात. मा हे अटेंशन आवडायचं. ते चांगो नाही ते मा कळां तेव्हा मी थोडा मोठा झो होतो. मी आणखी मोठा झो तेव्हा ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे मा कळां होतं. मी आणखी मोठा झो तेव्हा ‘आई म्हणून मी कोणास हाक मारू’ हे गाणं मी ऐकां होतं. मी आणखी मोठा झो आणि ‘देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्यानं आई निर्माण की’ हे वचन मी वाचां होतं. आता वयाची अशी स्टेज आहे की लवकरच आईला भेटाया जाईन. अण्णाही तिथंच भेटतील. मग मज्जाच मजा!…
– [email protected]

























































