बॉलिवूडची ही अभिनेत्री लग्नापूर्वीच होणार ‘आई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम कपूर, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता बॉलिवूडमध्ये अजून एका अभिनेत्रीला मातृत्वाची चाहुल लागली आहे. पण, ही अभिनेत्री अविवाहित असून विवाहापूर्वीच आई होणार आहे. तिने स्वतःच पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

या अभिनेत्रीचं नाव इलियाना डीक्रुझ. बर्फी, रुस्तम अशा मोजक्या पण हिट चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. इन्स्टाग्रामच्या अधिकृत हँडलवरून तिने आपल्या मातृत्वाबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. मात्र, ती गर्भवती आहे किंवा सरोगसीच्या माध्यमातून हे मातृत्व स्वीकारणार आहे, याचा खुलासा तिने अद्याप केलेला नाही.

काही वर्षांपूर्वी इलियाना अँड्य्रु नीबोन नावाच्या फोटोग्राफरसोबत नात्यात होती. मात्र, दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर ती अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यावर इलियानाने मौन बाळगलं होतं. आता तिच्या या पोस्टनंतर पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)