
पाण्याची बाटली ही आता प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाची वस्तू बनली आहे. घरात, कार्यालयात, प्रवासात सगळीकडे पाण्याची बाटली सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारात प्लास्टिकपासून स्टील, काच आणि तांबे अशा धातूच्या बाटल्याही विकत मिळतात. या बाटल्यांची किंमत किती आहे? असा प्रश्न जर कोणाला विचारला, तर त्याचे उत्तर काही 100 ते 1000 रुपये एवढे येऊ शकते, मात्र अशीही एक पाण्याची बाटली जगात आहे ज्या बाटलीची किंमत वाचून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या बाटलीचे वैशिष्ट्य तिची नोंद गिनीज बुकातसुद्धा करण्यात आली आहे.
एक्वा दि क्रिस्टेलो ट्रिब्यूटो ए मॉडिग्लीयानो, असे या बाटलीचे नाव आहे. ही बाटली गेल्या 13 वर्षांपासून जगातील सर्वात महागडी आणि फॅशनेबल पाण्याची बाटली म्हणून ओळखली जाते. या बाटलीची 2010पासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
Tributo Modigliani ही जगातील एकमेव अशी बाटली आहे. यामध्ये सोन्याव्यतिरिक्त प्लॅटिनम आणि उच्च दर्जाचा हिरा बनवला आहे. अल्तामिरानो या फाऊंडेशनने सामाजिक कार्यासाठी 5 लाख युरोही दिले आहेत. या बाटलीचे डिझाइन म्हणजे एक प्रकारचे शिल्प आहे, जे मुळातच खूप सुंदर दिसते.
बाटलीची किंमत
या बाटलीत फक्त 750 मिली पाणी भरले जाते. ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे. या बाटलीचे वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंग आणि डिझाइनमुळेच या बाटलीची किंमत एवढी आहे. प्रत्यक्षात ही बाटली 24 कॅरेट शुद्ध सोन्याची बनलेली आहे आणि त्यात भरलेल्या पाण्यात 5 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा समावेश आहे. एवढेच नाही तर त्यात भरलेले पाणी हे पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पाणी आहे. हे आइसलँड, फिजी आणि फ्रान्सच्या हिमनद्यांमधून आणले गेले आहे.
बाटलीची रचना
बाटलीची रचना कलाकार फर्नांडो अल्तामिरानो यांनी केली आहे, जो त्याच्या क्लासिक डिझाइनसाठी जगप्रसिद्ध आहे. त्याच्या खास आणि क्लासिक डिझाइनमुळे, 2010 मध्ये, या बाटलीला लिलावात 60 हजार डॉलर्स (48.60 लाख रुपये) पर्यंत बोली लावण्यात यश आले. या बाटलीला तिच्या डिझाइनसाठी पुरस्कारही मिळाला आहे.


























































