मायरा आता हिंदी मालिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोटय़ा पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली बालकलाकार मायरा वायकुळ हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांची लाडकी परी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. मायराची भूमिका खास असणार आहे, तीही हिंदी मालिकेत. तिच्या मालिकेचे नाव ‘नीरजा-एक नयी पहचान’ असे आहे. ही मालिका कलर्स वाहिनीवर पाहता येईल. मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘नीरजा’चा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती स्नेहा वाघ हिच्यासोबत दिसत आहे.

प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, नीरजा अर्थात मायराला घराबाहेर पडण्याची इच्छा असते. मात्र तिची आई स्नेहा वाघ काही कारणास्तव तिला घराबाहेर पडू देत नसते, यामध्ये तिच्या आईचा नाईलाज असतो. यामागचे नेमके कारण काय हे लवकरच समजेल.