
हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या कफ सिरपची आधी प्रयोगशाळेत चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीनंतरच या कफ सिरपच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे. 1 जूनपासून हा नियम लागू होणार आहे. हिंदुस्थानातून परदेशात निर्यात होणाऱया कफ सिरपमुळे गेल्या वर्षी गाम्बियात 66 तर उझबेकिस्तानात 18 मुलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर परदेश व्यापार महासंचालनालयाने सोमवारी ही अधिसूचना जारी केली.




























































