“आधार” बदल किती वेळा करता येतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधार कार्ड हे आपल्या देशातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, लिंग आणि पत्ता यांसारखी अनेक माहिती असते. जेव्हा या गोष्टींमध्ये बदल होतो तेव्हा ते आधारमध्ये अपडेट करणे आवश्यक असते. मात्र, आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी काही मर्यादा आहेत. जसे की तुम्ही तुमचे नाव आधार कार्डमध्ये फक्त 2 वेळा अपडेट करू शकता.

नाव 2 वेळा आणि जन्मतारीख फक्त 1 वेळा बदलता येते. आधारमध्ये तुम्ही तुमचे नाव फक्त दोनदा अपडेट किंवा बदलू शकता. तर जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता. दुसरीकडे, पत्ता तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता. लिंग देखील अपडेट केले जाऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या लिंगात काही बदल हवा असेल तर त्यासाठी एक वेळची सुविधा देखील आहे. तुम्ही ते एकदा बदलू शकता.
मर्यादेपेक्षा जास्त बदल करण्यासाठी काय करावे लागेल?
जर तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि लिंग अनेक वेळा बदलायचे असेल तर ते शक्य आहे. परंतु अपवादात्मक परिस्थिती असेल तरच हे होईल. यासाठी तुम्हाला पुन्हा आधारच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल. [email protected] शी संपर्क साधावा लागेल. ईमेल करावे लागेल. मग तुम्हाला ते का करायचे आहे याचे कारण सांगावे लागेल. त्यानंतर त्याच्याशी संबंधित तपशील आणि त्याचे पुरावे द्यावे लागतील. आधारचे प्रादेशिक कार्यालय योग्य तत्परतेने काम करेल. तुमचे अपील खरे असल्याचे आढळल्यास, क्षेत्रीय कार्यालय ते मंजूर करेल. तुमचे अपील योग्य आढळले नाही, तर मंजूरी दिली जाणार नाही.

बरोबर मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे
जर तुमचा योग्य मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट नसेल तर आधी तुम्हाला ते अपडेट करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल. जर मोबाईल नंबर अपडेट केला असेल तर तुम्ही ऑनलाइन काही बदल करू शकता. आधार केंद्रावर जाऊन तुम्ही सहज मोबाईल नंबर अपडेट करू शकता.

शुल्क भरावे लागेल
यासाठी तुम्हाला थोडे शुल्कही द्यावे लागेल. उदाहरणार्थ, बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील, तर डेमोग्राफिक अपडेटसाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. 14 जूनपर्यंत आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी सरकार कोणतेही शुल्क आकारत नाही .