
शेतकऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या, तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी तुडवणान्या, गलिच्छ राजकारणापोटी काँग्रेस भवनातील खुर्च्या पळवणाऱ्या हनुमानफेम कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कारनाम्यांच्या सुरस आणि रम्य कथा हळूहळू बाहेर येत आहेत. अकोला धाड, १५० कोटींच्या घोटाळ्यानंतर आता सत्तारांनी मांडलेल्या बदल्यांच्या बाजाराचा पर्दाफाश झाला आहे. सत्तारांनी उसनवारीवर नेमलेला पीए दीपक गवळीचे पाय धरल्याशिवाय कृषी विभागात बदलीचे पानही हलत नाही! अगदी सहसंचालकांपासून ते चपराशांपर्यंत कर्मचारी हिमायतबागेतील शेतकरी संवाद केंद्रावर बदलीसाठी गवळीच्या मिनतवाऱ्या करण्यासाठी येतात.
कृषीखात्याचे मंत्री झाल्यापासून अब्दुल सत्तार यांची हनुमान उडी जरा जास्तच चर्चेत आली आहे. अकोला येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कोपऱ्यात बसवून सत्तारांच्या कार्यकर्त्यांनीच कृषी व्यावसायिकांवर धाडी टाकून पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या कीटकनाशकाच्या टेंडरमध्ये तब्बल १५०
कोटींचा गोलमाल करण्यात आला. मर्जीतल्या कंपनीला टेंडर देण्यासाठी चक्क अटी-शर्तीच बदलण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगरातील हिमायतबाग मोगलकालीन असून, याचा बहुतांश भाग हा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. अब्दुल सत्तार कृषिमंत्री झाले आणि त्यांनी हिमायतबागेत घुसखोरीच केली. येथील शेतकरी संवाद केंद्राचे चक्क बदलीकेंद्र बनवण्यात आले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र बनवण्यात आले आहे. उसनवारीवर पीए बनवण्यात आलेला दीपक गवळी येथे बसूनच बदल्यांचे व्यवहार करतो. एवढेच काय दीपक गवळीने बदल्यांचे व्यवहार करण्यासाठी चक्क खासगी लोकांची नेमणूक केली आहे. या दीपक गवळीचे प्रस्थच असे की कृषी विभागाचे पान याच्याशिवायहलत नाही. सहसंचालक असो की, चपराशी. गवळीने मोहोर उठवल्याशिवाय बदलीचा कागदच निघू शकत नाही. शेतकऱ्यांसाठीच बनवण्यात आलेल्या या केंद्रात सध्या शेतकऱ्यांनाच येण्यासाठी मनाई आहे.
मी आल्यावरच गेट खुले करा हिमायतबागमध्ये प्रवेश
करण्यासाठी उभारण्यात आलेले गेट हे केवळ मी आल्यानंतरच खुले करा, इतरांनी दुसऱ्या गेटचा वापर करावा, असे फर्मान कृषिमंत्री सत्तार यांनी सोडले होते. मात्र, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी दुसरे गेट कायमचे खुले केले तर परिसरातील टवाळखोरांचा उपद्व्याप वाढू शकतो. त्यामुळे ते योग्य ठरणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, हे कारण सांगू नका ते गेट खुले करा, नाहीतर बदलीच करेन, अशी धमकी सत्तारांनी दिल्याने कर्मचाऱ्यांचा नाईलाज झाला.
गाडीचालकाला गेस्टहाऊस दिले नाही म्हणून तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचे फर्मान
अकोला येथे कृषी व्यावसायिकांवर बोगस धाडी टाकणाऱ्या पथकाचा म्होरक्या असलेला जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष श्रीराम महाजन याच्या गाडीचालकाला गेस्टहाऊस दिले नाही म्हणून गडचिरोली येथे करण्याचे बदली करण्याचे फर्मान अब्दुल सत्तार यांनी सोडले होते. मात्र हे अधिकारी विद्यापीठाचे कर्मचारी असल्यामुळे त्यांची अशी बदली करता येणार नाही, असे विद्यापीठाने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्तार यांनी तीनही अधिकाऱ्यांची अतिशय अपमानास्पद रीतीने बदली केली.
कार्यकतें गेस्टहाऊसवर पडेल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधन करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हिमायतबाग परिसरात गेस्टहाऊस उभारले आहे. वैज्ञानिक भवन असे नाव असलेल्या या इमारतीचा ताबा अब्दुल सत्तारांकडेच असतो. सत्तारांचे कार्यकर्ते इथे २४ तास पडलेले असतात. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून हे कार्यकर्ते हिमायतबागेच्या पावित्र्याचा बाजार मांडतात.
हिमायतबाग नव्हे बदलीबाग !
छत्रपती संभाजीनगरातील हिमायतबाग मोगलकालीन असून, याचा बहुतांश भाग हा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. अब्दुल सत्तार कृषिमंत्री झाले आणि त्यांनी हिमायतबागेत घुसखोरीच केली. येथील शेतकरी संवाद केंद्राचे चक्क बदलीकेंद्र बनवण्यात आले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र बनवण्यात आले आहे. उसनवारीवर पीए बनवण्यात आलेला दीपक गवळी येथे बसूनच बदल्यांचे व्यवहार करतो. एवढेच काय दीपक गवळीने बदल्यांचे व्यवहार करण्यासाठी चक्क खासगी लोकांची नेमणूक केली आहे. या दीपक गवळीचे प्रस्थच असे की कृषी विभागाचे पान याच्याशिवाय हलत नाही. सहसंचालक असो की, चपराशी गवळीने मोहोर उठवल्याशिवाय बदलीचा कागदच निघू शकत नाही. शेतकऱ्यांसाठीच बनवण्यात आलेल्या या केंद्रात सध्या शेतकऱ्यांनाच येण्यासाठी मनाई आहे.





























































