
खोक्यांच्या आमिषाने शिवसेनेबरोबर मिंधे गटाने गद्दारी केली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. शिवसेनेत फूट पाडण्याचे महापाप करणाऱया ‘त्या’ 40 गद्दार आमदार आणि खासदारांविरोधात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह विविध ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘जागतिक गद्दारदिनी’ निदर्शने करून निषेध करण्यात आला. ‘पन्नास खोके… खाऊन खाऊन माजलेत बोके’ अशा घोषणा देण्यात आल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे अधिक जोमाने काम करण्याची शपथ घेत त्या 40 गद्दार आमदार व खासदारांना 2024च्या निवडणुकीत जागा दाखविण्याचा निर्धारही केला. यावेळी ‘पन्नास खोके… खाऊन खाऊन माजलेत बोके’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आज बिंदू चौक येथे प्रतीकात्मक 50 खोके मांडून मिंधे सरकारविरोधात आंदोलन केले. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, युवराज खंडागळे, विवेक काटकर, मंजित माने, दीपाली शिंदे, अनिता ठोंबरे, स्मिता सावंत, स्वरूपा खुरंदळे, दिलीप देसाई, दिनेश साळोखे, विनोद खोत, महादेव कुकडे, विराज ओतारी, किशोर दाभाडे, रमेश पाटील, अभिजित पाटील, सुशील भांदिगिरे, किरण पडवळ, विराज पाटील, विशाल सूर्यवंशी, माधुरी जाधव, रणजित आयरेकर, राहुल माळी, प्रदीप हांडे, वर्षा पाटील, माधवी लोणारे, विजय देसाई, सुरेश कदम, किशोर माने, सहभागी झाले होते.
‘घे खोका, दे धोका’ सांगलीत निदर्शने
सांगली जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘जागतिक गद्दारदिनी’ आज निदर्शने करून गद्दारांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी ‘घे खोका आणि दे धोका’ अशा घोषणा देत शिवसैनिकांचा परिसर दणाणून सोडला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. चौका 50 खोके मांडून त्यावर विविध 50 घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. यावेळी महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी, सुरेश साखळकर, राकेश कलकुटगी, विठ्ठल संकपाळ, माधवनगरचे शहरप्रमुख किरण पवार, तालुकाप्रमुख अण्णा विचारे, शुभम उपाध्ये, विशाल गोसावी प्रताप पवार, उपसरपंच भगवान केंगार, गणेश लोखंडे, शीतल थोरवे, अनिकेत कराळे, अशोक काटकर, राजदीप काटकर, प्रज्वल वडार, सुनीता पाटील, हेमा कदम, माधुरी चव्हाण, स्नेहल माळी, तमन्ना सतारमेकर, स्वप्नाली गायकवाड, सुनील खरात, राहिल शेख उपस्थित होते.
गद्दारांविरोधात सोलापुरात रॅली
जागतिक गद्दार दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने सोलापूर शहरात रॅली काढण्यात आली. ‘50 खोके… एकदम ओक्के’ असे फलक गाडय़ांना लावून नवी पेठ दत्त चौक ते मधला मारुती अशी रॅली काढण्यात आली. यावेळी गद्दार आमदारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील संघटक महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, शहर उपप्रमुख बाळासाहेब गायकवाड, संताजी भोळे, अमर माने, उज्ज्वल दीक्षित, अमित अंजिखाने, अमित भोसले, संदीप बेळमकर, सतीश माने, बाळासाहेब माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली, ईश्वरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; गद्दारांचा निषेध
मिंधे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज एक वर्ष पूर्ण झाले. खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगलीत ‘गद्दार दिवस’निमित्त आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकाविलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे, असे सांगण्यात आले.
सांगलीत शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे ‘गद्दार दिवस’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘चले जाव… चले जाव… गद्दार गुवाहाटी चले जाव’, महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त’, ‘महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार’ आदी घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, तानाजी गडदे, उत्तम कांबळे, स्वाती पारधी, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, वैशाली कळके, ज्योती अदाटे, छाया जाधव, समीर कुपवाडे, आयुब बारगीर, बीरेंद्र थोरात, डॉ. शुभम जाधव, महालिंग हेगडे, उमर गवंडी, अर्जुन कांबळे, संगीता जाधव, आशा पाटील, विनायक हेगडे, प्रकाश सूर्यवंशी, इर्शाद पखाली, फिरोज मुल्ला, अरुण चव्हाण, मुन्ना शेख, नंदकुमार घाडगे, अमिन शेख, जमीर ऐनापुरे, अझर सय्यद, सचिन सगरे आदी यावेळी उपस्थित होते.
ईश्वरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ईश्वरपूर येथील कचेरी चौकात गद्दारांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘50 खोके, एकदम ओके; खोके सरकार हाय-हाय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, नेताजीराव पाटील, शहाजी पाटील, भिमराव पाटील, अरुण कांबळे, ऍड. विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, रोझा किणीकर, संग्राम जाधव, शिवाजी चोरमुले, विशाल सुर्यवंशी उपस्थित होते.
























































