जॅकवेलच्या कामासाठी मागितली ब्लास्टिंगची परवानगी, सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनी योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी योजने’मधून उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला वर्कऑर्डर दिल्यानंतर कंपनीने तातडीने कामाला सुरुकात केली. जॅकवेलचे काम लवकरात लवकर करण्यासाठी पोचमपाड कंपनीने सेंट्रल कॉटर कमिशन आणि राज्य जलसंपदा विभागाकडे ब्लास्टिंग करण्याची परवानगी मागितली आहे.

समांतर जलवाहिनीचे काम जुलै महिन्यात सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात जॅकवेलचे काम करता येणार नाही म्हणून तातडीने उजनी धरणात जॅकवेलच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. हे काम लवकरात लवकर करण्यासाठी पोचमपाड कंपनीच्या कर्मचाऱयांनी सर्व नियम, अटी बासनात गुंडाळून उजनी धरण क्षेत्रात विस्फोटन केले होते, यावरून बराच गदारोळ झाला होता.

नियमानुसार उजनीच्या धरण क्षेत्रात विस्फोटन करता येत नाही. कारण जर ब्लास्टिंग उडवले तर 117 टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणाच्या बंधाऱयांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्लास्टिंग केल्याची ही बाब पाटबंधारे विभागाला समजताच, अधिकाऱयांनी तातडीने उजनी धरणाला भेट देऊन पोचमपाड कंपनीचे काम थांबून जॅकवेलचे काम ब्रोकरने (छिन्नी पद्धतीने) करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोचमपाड कंपनीने जॅककेलच्या कामाला ब्रेकरने सुरुवात केली. मात्र, या कामाला खूपच केळ जात आहे. याशिवाय ब्रेकरने काम करणे शक्य नाही, त्यामुळे उजनी धरणात जॅकवेलच्या कामासाठी विस्फोटन करण्याशिवाय पर्याय नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. आता कंपनीने सोलापूर महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’कडून सेंट्रल कॉटर कमिशन आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडे ब्लास्टिंग करण्याची परवानगी मागितली आहे. तसा प्रस्ताव पाठवला आहे.

सेंट्रल वॉटर कमिशनच्या पथकाने केली पाहणी

सेंट्रल वॉटर कमिशनच्या पथकाने उजनी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या कामाची पाहणीही केली आहे. उजनी धरण्याच्या बंधाऱयापासून जॅकवेलचे अंतर 300 मीटर असेल तर ब्लास्टिंग उडवता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या जॅकवेलचे अंतर 600 मीटरहून अधिक आहे. तेक्हा संबंधित विभाग यासाठी परवानगी देणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.