फोनवर ‘हायजॅकिंग’ची चर्चा; सहप्रवासी आणि क्रूच्या तक्रारीनंतर विस्तारातील प्रवाशाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vistara

दिल्लीला जाणार्‍या विस्तारा फ्लाइटमधील एका पुरुष प्रवाशाला क्रू मेंबरने फोनवर ‘अपहरणाबद्दल’ बोलताना ऐकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

एका पोलीस अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, ‘क्रू मेंबरनं ताबडतोब अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि पोलिसांनाही सतर्क करण्यात आलं’.

केबिन क्रूच्या एका सदस्यानं आणि इतरांनी पुरुष प्रवाशाला त्याच्या मोबाइल फोनवर बोलताना ऐकलं. त्यांनी त्याला हिंदीत बोलताना ऐकलं – ‘अहमदाबाद का फ्लाइट बोर्ड करने वाला हैं। कोई भी दिक्कत हो तो मुझे कॉल करना’, असं तो म्हणाला.

प्रवाशानं ‘हायजॅक का सारा प्लानिंग है’ असंही सांगितलं. ‘उसका सारा नियोजन है, चिंता मत करना’, असं बोलणं झाल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.

त्याचं संभाषण ऐकल्यानंतर, शेजारी बसलेले प्रवासी घाबरले आणि त्यांच्यापैकी बरेचजण उभे राहिले. केबिन क्रू मेंबरने फ्लाइटच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना बोलावलं आणि प्रवाशाला CISF च्या ताब्यात देण्यात आलं’, असंही त्यांनी सांगितलं.

त्यानंतर रितेश जुनेजा असं या प्रवाशाचं नाव आहे. या प्रवाशाला सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि 27 वर्षीय केबिन क्रू सदस्यानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की, प्रवासी मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि 2021 पासून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशानं तिच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केल्यानं तिला अटक करण्यात आली होती.

पोलीस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले आणि तिच्या बॅग तपासण्यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आलं होतं, एफआयआरमध्ये नमूद केलं आहे की कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन ताब्यात घेतलं होतं.