
‘रांझणा’ या चित्रपटाने नुकतीच दहा वर्षे पूर्ण केली असून आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या सुपरहिट चित्रपटाची दहा वर्षे पूर्ण करत असताना आनंद एल राय त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘तेरे इश्क में’ हा नवा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. अभिनेता धनुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. धनुषने ‘रांझणा’द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. धनुषच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.




























































