
सध्या सोशल मीडियाच्या जगात आपली मतं मांडण्यासाठी ट्विटर या माध्यमाचा वापर केला जातो. नेटकरी आपली मतं ट्विटरवर व्यक्त करतात. पण, सगळ्यात प्रभावी सोशल मीडिया अशी ओळख असलेल्या ट्विटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.
अनेक ट्वीट्स दिसेनाशी झाली असून त्यामुळे नेटकरी वैतागले आहेत. गंमत म्हणजे, ट्विटर काम करत नसल्याचा ट्रेंड ट्विटरवरच व्हायरल झाला आहे. #TwitterDown हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत असून ट्विटर पूर्ववत होण्याची नेटकरी वाट पाहत आहेत.




























































