भिंत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शौचालयासाठी गेलेल्या किसन धुळा या कामगाराच्या अंगावर भिंत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांचा कांदिवली येथे कपडय़ांचा कारखाना आहे. त्या कारखान्यात किसन हा काम करत होता. गुरुवारी किसन हा शौचालयात गेला तेव्हा पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलवर बांधलेल्या शौचालयाची भिंत पडून किसन जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी किसनला मृत घोषित केले. त्या घर मालकाला शौचालयाची भिंत धोकादायक झाल्याबाबत तक्रारदेखील केली होती, मात्र घर मालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने घर मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.