
टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना आता त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरेण्टमध्येही दिसायला लागला आहे. अशामध्ये सर्वांच्या आवडत्या मॅकडोनल्ड्सच्या बर्गरमधूनही टोमॅटो गायब झाला आहे. त्यामुळे बर्गर प्रेमींना विना टोमॅटो बर्गर खाण्याची वेळ आली आहे.
मॅकडोनलड्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदलामुळे आणि बऱ्याच प्रयत्नानंतरही आम्हाला चांगल्या दर्जाचे टोमॅटो मिळत नाही आहेत. त्यामुळे आमच्या काही आऊटलेट्समध्ये बर्गरमध्ये वगैरे टोमॅटो नाही मिळत आहेत. जास्त किमतीमुळे मॅकडोनल्ड्स इंडिया उत्तर आणि पूर्व येथील काही आऊटलेट्समधून टोमॅटो गायब झाले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हवामानातील बदलामुळे दर्जेदार टोमॅटो मार्केटमध्ये मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे आम्ही टोमॅटोचा वापर करणं बंद केलं आहे. अर्चना नावाच्या ग्राहकाने जेव्हा मॅकडोनल्ड्समध्ये टोमॅटो बर्गर ऑर्डर केला. त्यावेळी त्यांच्याकडून सध्या ते बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर करत नाहीयत. त्यामुळे आता टोमॅटोशिवाय बर्गर ऑर्डर घेतले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो अक्षरश: फेकण्यात आले होते. मे मध्ये नाशिकमध्ये टोमॅटो 1 रूपये प्रतिकिलो विकला जात होता. मात्र आता टोमॅटोचे भाव गगनाला भिडले. यावर्षी पाऊल लांबला आणि त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला. देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात घटला आहे. या सर्व कारणांमुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.


























































