बॉलीवूडमध्ये क्षितीने मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळय़ाच जमेच्या बाजू असल्याने चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. चित्रपटातील नामवंत चेहऱयांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळय़ा अभिनेत्रीचा, क्षिती जोगचा. चित्रपटात क्षितीने लक्षवेधी व्यक्तिरेखा साकारली आहे. या उत्तम अभिनयामुळे अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी क्षितीवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. एका बिग बजेट चित्रपटात इतक्या मोठय़ा दिग्दर्शकाबरोबर, कलाकारांसोबत काम करून क्षितीने चाहत्यांना ख़ुश केले आहे.

करणच्या जोहरच्या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती म्हणाली, ‘‘यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून काwतुक होणे हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते.
मला या चित्रपटात दोन वेगळय़ा पिढींतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. या सगळय़ांसोबत काम करताना खूप मजा आली, खूप शिकता आले. एपंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता.