जितेंद्र आव्हाड यांनी केली पोलखोल, भाजपमधील घराणेशाहीची केली यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. भाजपकडून कायम घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका केली जात असते. मात्र भाजपमध्येही घराणेशाही चालते याची पोलखोलच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भाजपमध्ये किती नेत्यांच्या मुलांना, नातेवाईकांनाच मोठ मोठी पदं, खासदारकी आमदारकी दिली गेल्याची यादी आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या पोस्ट भाजपमध्ये कशाप्रकारे घराणेशाही आहे ते दाखवले आहे. यात सर्वात अग्रस्थानी नाव हे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आहे. पीयूष गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र आहेत. त्यासोबत धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर, वरुण गांधी, नितेश राणे अशा अनेकांची नावं आव्हाड यांनी शेअर केली आहेत. तसेच भाजपकडून कशाप्रकारे त्यांच्याच नेत्यांच्या मुलांना नातेवाईकांना तिकीट दिले जाते याचीही यादी त्यांनी शेअर केली आहे.