हिंदुस्थानला फलंदाजच जगज्जेते बनवू शकतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2013 सालानंतर हिंदुस्थान एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. परंतु आताही तुम्ही घाबरू नका. हिंदुस्थानला जगज्जेते बनविण्याची क्षमता फलंदाजांमध्ये आहे आणि तेच यजमान हिंदुस्थानला पुन्हा एकदा जगज्जेते बनवू शकतात, असा दृढविश्वास माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केला. सायकल अगरबत्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौरभ भरभरून बोलला.

हिंदुस्थान प्रत्येक वेळी जगज्जेता होऊ शकत नाही. प्रत्येकाचा एक वाईट काळही असतो. हिंदुस्थानी फलंदाजांना  आणखी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. ते यशस्वी ठरले तर आपण नक्कीच वर्ल्ड कप जिंकू शकतो, असे गांगुली म्हणाला. त्याने चहलच्या जागी निवडण्यात आलेल्या अक्षर पटेलचीही पाठराखण केली. तो उपयुक्त फलंदाजी करतो. त्यामुळेच तो चहलऐवजी संघात आहे आणि ही निवड योग्य आहे. आपला कुणी जखमी झाला तर चहल त्याची जागा नक्कीच घेऊ शकतो. तसेही आता 17 खेळाडूंची निवड करण्यात आली असून दोन खेळाडूंना तसेही बाहेर जावे लागणार असल्याची आठवण गांगुलीने करून दिली.