
कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोनजणांना लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. अभिषेक विजय मोढवे, (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापुर रोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.
बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे 19 ऑगस्ट 2023 रोजी रात्री मालवाहू टेम्पो नेणाऱ्या मंडपवाल्या दोघांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून तक्रारद्रांकडील 11 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. तपास सुरू असताना गुन्ह्यातील अभिषेक विजय मोढवे या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोउपनिरीक्षक अश्विनी मोरे, पो.ना. संदिप पितळे, पो.कॉ. तानाजी पवार, पो.कॉ. सत्यजीत शिंदे, पो.कॉ. दिपक रोहोकले यांनी ही कारवाई केली.




























































