यंगिस्तान: किल्ले मांजारसुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

1490 च्या सुमारास अहमद निजामशहाने नगरचा बलाढय़ भुईकोट किल्ला बांधला. नगरच्या किल्ल्यासोबत फराहबाग पॅलेस, चांदबिबी महाल व मांजारसुभा किल्ल्यासारख्या देखण्या कलाकृतींचे बांधकामसुद्धा निजामशाही कालखंडातच झाले. यातील मांजारसुभा हा काहीसा अपरिचित किल्ला आहे.

मांजारसुभा किल्ल्यास भेट देण्यासाङ्गी आपणास नगरपासून दहा किलोमीटरवर असलेला वांबोरे फाटा गाङ्गावा लागतो. त्या फाटय़ापासून 15-20 मिनिटांत आपण मांजारसुभा गावात येऊन पोहोचतो. गावात प्रवेश करताच मांजरसुभा गड व त्यावरील इमारती आपले लक्ष वेधून घेतात. मांजारसुभा गडाला तीन बाजूंनी नैसर्गिक खंदकासारखी रचना असल्याने गडाच्या फक्त समोरील बाजूस संरक्षणासाठी परकोट बांधला आहे, पण सध्या या परकोटाचे नाममात्र अवशेष शिल्लक आहेत. हा बुरूज पाहून पुढे गेल्यावर महादेवाचे एक मंदिर लागते. महादेवाचे दर्शन घेऊन मांजरसुभा गडाकडे जाणारा रस्ता गाठायचा.

पायथ्यापासून दहा मिनिटांत आपण मांजरसुभा गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. प्रवेशद्वाराचे वैशिष्टय़ म्हणजे याच्या देवडय़ा प्रवेशद्वाराच्या आत नसून त्या बाहेर बांधलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या आत आपणास सुंदर असा घुमट व काही नक्षीदार देवळय़ा दिसून येतात.

मांजरसुभा गडाचा विस्तार हा आटोपशीर आहे. प्रवेशद्वाराच्या समोर मळलेल्या पायवाटेने पुढे गेलो असता सद्यस्थितीत कशीबशी तग धरून असलेली राजवाडय़ाची भग्न वास्तू लागते. ही वास्तू इतिहासकाळात साधारण तीन मजली असल्याच्या खाणाखुणा येथे दिसून येतात. या राजवाडय़ाच्या भग्न वास्तूजवळच डाव्या हाताला हमामखान्याची वास्तू आहे. हमामखान्याची वास्तू पाहून झाल्यानंतर राजवाडय़ाच्या उजव्या हाताला एक चौरसाकृती विस्तीर्ण तलाव दिसून येतो. हा तलाव पाहून पुढे गेल्यावर राजवाडय़ाच्या बरोबर मागे एक दर्गा आहे. या दर्ग्याच्या पुढील बाजूस एक हौद व त्याच्यापुढे एक सुंदर नक्षीदार अष्टकोनी दगडी कारंजे आहे.

दर्ग्याचा परिसर पाहून झाल्यावर आपणास बाजूच्या कडय़ावरील बुरूज खुणावतो. या बुरुजात उतरण्यासाङ्गी दगडी जिना आहे. दगडी जिन्याने या बुरुजात उतरल्यावर हवेचा भन्नाट झोत आपले स्वागत करतो. या बुरुजात हवा खेळती राहण्यासाङ्गी कमानी व झरोक्यांची रचना केलेली आहे. यातील एका कमानीतून खाली डोकावून पाहिल्यास आपणास कडय़ाच्या पोटात असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे दर्शन होते. इतिहासकाळात या भव्यदिव्य बुरुजाचा उपयोग ‘हत्तीमोट’ म्हणून केला जायचा. खालील टाक्यांतील पाणी मोटच्या सहाय्याने ओढून तलावात आणि किल्ल्यावर खेळवले जायचे. हा वैशिष्टय़पूर्ण बुरूज पाहून आपण गडाच्या पिछाडीस असलेल्या एका छोटेखानी प्रवेशद्वाराकडे येऊन पोहोचतो. हे प्रवेशद्वार सहजासहजी लक्षात येत नाही. येथून खाली आल्यावर आपण गडाच्या पोटात असलेल्या पाच-सहा कातळकोरीव टाक्यांपाशी येऊन पोहोचतो. मांजारसुभा गड आजही निजामशाहीच्या ऐश्वर्यसंपन्न वास्तूशैलीची सैर घडवून आणतो.

  • मांजारसुभा किल्ल्याची बांधणी हुसेन निजामशहाने इसवी सन 1553 ते 1565 यादरम्यान केली. या गडाला ‘मंजर ये सुबह’ वा ‘मांजारसुबा’ असेही संबोधतात. या गडाचा वापर मुख्यत्वे टेहळणीसाठी व शाही परिवारातील व्यक्तींच्या विश्रांतीसाठी केला जायचा.