
गद्दार आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आठवड्याभरासाठी घाना देशात होणाऱ्या राष्ट्रकूल संसदीय परिषदेसाठी जाणार होते. मात्र त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्षेप घेतला. यानंतर नार्वेकर यांनी आपला दौरा रद्द केला. हा दौरा रद्द झाल्यानंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
‘मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला. नार्वेकर यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे. त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
After asking the right questions, just like the illegal cm of Maharashtra, the speaker had to cancel his foreign trip.
The joke was, he was scheduled to go to the Commonwealth Parliamentary Conference, while his delay tactics are trying to kill democracy in India’s second… pic.twitter.com/xhx7ZMnPqZ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 30, 2023
दरम्यान, आमदार अपात्रतेसंदर्भात नार्वेकर यांच्याकडून चालढकलपणा सुरू आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी काढल्यावरही नार्वेकर यांनी तारखांचा खेळ चालवला आहे. अपात्रतेसंदर्भात एका आठवडय़ात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असूनही ते प्रक्रिया लांबवत आहेत. याविरोधात शिवसेनेकडून आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर नार्वेकर यांनी आपला घाना दौरा रद्द केला. ते 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात आफ्रिकेतील घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते.
परदेश दौऱ्यावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांची ‘सहल’ रद्द, आदित्य ठाकरे यांचा टोला




























































