सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असा डांगोरा पिटला जात असलेल्या सातारा जिह्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे – पाटील, उपनेत्या छाया शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, संजय भोसले, रामदास कांबळे, हणमंतराव चवरे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले, राज्य शासनाने राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिह्यातील वाई आणि खंडाळा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. पण, जिह्यातील सर्वच तालुक्यांत यंदा पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे संपूर्ण जिह्यातच दुष्काळ जाहीर करावा. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे तत्काळ शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग करावेत, शेतकऱयांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर करावी, सोयाबीनला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा. उसाला टनाला चार हजार रुपयांचा दर मिळावा, शेतकऱयांना वीज मोफत द्यावी, शेतकऱयांना पीक कर्ज वाटप करून वसुली थांबवावी, येथील धरणातील पाणीसाठा येथीलच लोकांसाठी राखीव ठेवावा आदी मागण्याही निवेदनात केल्या आहेत.