
नवी नास्ट्रेदमस म्हणून प्रसिद्ध असलेल्या फ्रान्सचे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी अमेरीकेबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरीकेवर लवकरच मोठे संकट येणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. त्यामुळे अमेरीकेला नैसर्गिक आपत्ती किंवा मोठ्या भूकंपाचा सामना करावा लागणार आहे.
क्रेग यांनी आपले युट्युब चॅनल कॉफी विथ क्रेग वर नवीन व्हि़डीओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी अमेकरीकेबाबत भविष्यवाणी केली आहे. व्हिडीओत ते म्हणाले की, अमेरीकेतील राजकारणात मोठी हानी होणार आहे. अमेरीकेच्या कॅलिफोर्निया आणि टेक्सास शहराला मोठा फटका बसणार आहे. या दोन्हा जागेवर तेल मोठ्या प्रमाणात आहे.
क्रेग यांनी दावा केला आहे की, 2024 साली अमेरीकेत मोठे भूकंप होणार आहेत. यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील अनेक शहरं नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच मी बघू शकतो की पश्चिम किनारपट्टीपर्यंत प्रचंड भूकंप आणि नैसर्गिक घटना घडतील,त्यामुळे अनेक गोष्टी उद्ध्वस्त होतील. 2024 मध्ये जे काही होईल ते काळीज पिळवटणारे असणार आहे.
नास्त्रेदमस हे फ्रान्सचे 16 व्या शतकातील भविष्यकार होता. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. रशियन युद्धाचं भाकीतही नास्त्रेदमसने फार पूर्वीच केले होते आणि नैसर्गिक घटनांशी संबंधित अनेक भाकीतही खरी ठरली आहेत.


























































