
2.59 कोटी रुपयाचे सोने तस्करी प्रकरणी अहमदाबाद मधील मुख्य हॅन्डलरला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. डीआरआयने सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करून आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक केली.
गेल्या आठवडय़ात जेदाह येथून दोन जण सोने घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. डीआरआय मुंबईच्या पथकाने त्या दोघांना अटक करून त्याच्याकडून 2. 59 कोटीचे सोने जप्त केले होते. त्या दोघांच्या चौकशीत डीआरआय ला महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतर डीआरआयचे पथक अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेल मधून मुख्य हॅन्डलरला डीआरआयने ताब्यात घेतले. त्या हॅन्डलर कडून 5 लाख 21 हजार रुपये डीआरआय ने जप्त केले. सोने तस्करी प्रकरणी डीआरआयने मुंबई आणि अहमदाबाद येथून एकूण सहा जणांना अटक केली आहे.





























































