राज्यसभेसाठी भाजपचे 14 उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंग आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यासह 14 उमेदवारांची नावे आज जाहीर केली. त्रिवेदी यांचा एकमेव अपवाद वगळता बाकी सर्व नवीन चेहरे आहेत. कर्नाटकातील नारायणसा के भंडगे, छत्तीसगढचे गोंड राजघराण्यातील देवेंद्र प्रताप सिंह, बिहारसाठी धर्मशिला गुप्ता आणि भीम सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत. हरियाणासाठी भाजपचे माजी अध्यक्ष सुभाष बराला, तर समिक भट्टाचार्य पश्चिम बंगालमधून उमेदवार असतील. आजच्या नावांमध्ये एकाही केंद्रीय मंत्र्याचे नाव नाही.