
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने येत होत्या. मात्र ‘बिग बॉस 14मधील ही प्रसिद्ध जोडी अखेर वेगळी झाली आहे. ही बातमी खरी असून पवित्रा पुनियाने दोघंही वेगळे झाल्याचे सांगितले आहे.
‘बिग बॉस 14मध्ये स्पर्धक म्हणून एजाज खान आणि पवित्रा पुनिया घरात प्रवेश घेतला होता. दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते की, बिग बॉसनंतरही दोघं सतत एकत्र होते. त्यांचे नाते घट्ट होते. पण दोघं पाच महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि सगळ्यांनाच धक्का बसला. दोघंही एकाच अपार्टमेण्टमध्ये राहत होते. गेल्या महिन्यात एजाजने ते अपार्टमेण्ट सोडले आणि तो त्याच्या मालाडच्या घरी शिफ्ट झाला. मात्र पवित्रा त्याच अपार्टमेण्टमध्ये राहते आहे.
पवित्रा पुनिया हिने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले, म्हणाली, नातेसंबंधांमध्ये देखील शेल्फ-लाइफ असू शकते. ते कायमस्वरुपी नसते. काही महिन्यांपूर्वी आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याला कायम माझ्याकडून शुभेच्छा आहेत. मी त्याचा खूप आदर करते, पण हे नाते शेवटपर्यंत टिकले नाही. तर एजाजशी संपर्क साधल्यानंतर तो म्हणाला, मी आशा करतो की, पवित्राला तिच्या आयुष्यात यश आणि प्रेम मिळो. ती कायम माझ्या दुआचा एक भाग असेल असे सांगितले.
पवित्रा पुनिया टीव्ही शो नागमणीमध्ये अखेरची दिसली होती, तर एजाज शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा भाग होता. बीबीमध्ये सहभागी झाल्यावर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. दोघे अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे कोणतेही फोटो हटवलेले नाहीत.



























































