
एकीकडे ईडीचा दबाव आणुन विरोधी पक्षातील बडया नेत्यांना गळाला लावण्याचे धंदे मोदी सरकारकडून सुरु आहेत. तर दुसरीकडे जगाला आज सर्वत्र भ्रष्टाचारमुक्त सरकारांची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून कमीत कमी सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन असेच आपले सुत्र राहीले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी केले. त्यामुळे मोदी सरकारला नेमक्या कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे, असा सवाल सर्वासमान्यांकडून केला जातोय. दुबई येथे जागतिक सरकार परिषदेत ते बोलत होते.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन राशीद अल मखतूम यांच्याशी द्वीपक्षीय करारांवर चर्चा करण्यात आली. वीज, बंदरे, रेल्वे, गुंतवणूक असे अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
मोदींचे सुशासनाचे मंत्र
– गुजरात सरकारमध्ये 23 वर्षे होतो. त्यावेळी किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन या सूत्रावर भर दिला.
– लोकांना प्रशासन कुठेही कमी पडतेय असे वाटता कामा नये. परंतु, त्यांच्यावर प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टीसाठी दबावही आणू नये.
– एका बाजूला जग आधुनिकतेच्या दिशेने जात आहे तर दुसरीकडे पुढच्या शतकातील आव्हाने जगासमोर आहेत.
लोकांच्या जीवनात कमीत कमी डोकावा
मन की बात तसेच तंत्रज्ञानाचा सफाईने वापर करत मोदी सरकारने हिंदुस्थानवासियांच्या आयुष्यावर जणू ताबा मिळवला आहे. असे असताना मोदींनी दुबईत जगाला वेगळाच मंत्र दिला. लोकांच्या जीवनात शक्य तेवढे कमी डोकावा असे मोदी म्हणाले. मोदींनी हिंदुस्थानचा उल्लेख भारत असा केला. भारत हे सध्याच्या काळातील आधुनिकतेचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.


























































