पुणेरी पलटण जिंकली रे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेकटच्या चढाईपर्यंत श्वास रोखलेल्या सामन्यात अखेर पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा अवघ्या 3 गुणांनी पराभव करत प्रो कबड्डीतील आपले पहिलवहिले जेतेपद पटकाकले. पुण्यातल्या या संघाला गेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात पंकज मोहितेने एका चढाईत टिपलेल्या चार गुणांनी सामन्यात पुण्याला आघाडी मिळवून दिली. मोहिते 9 चढायांमध्ये 9 गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली. मोहित गोयतनेही चढाईत 5 गुण संपादले. या दोघांना एकदाही आपल्या जाळ्यात हरियाणा ओढू शकला नाही. पूर्ण स्पर्धेत चढाईत 142 आणि 23 पकडींचे गुण मिळविणाऱया अस्लम इनामदारने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला. पुण्याचाच मोहम्मदरेझा सर्वोत्तम बचावपटू ठरला.