
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी तसेच लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी 300 रुपयांची प्रतिसिलिंडर सूट पुढील वर्षभरासाठी वाढविण्यात आली आहे. या अनुदानाची मुदत मार्च 2024 पर्यंत होती. याशिवाय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय 2024 पासून पूर्वलक्ष्यीप्रभावाने लागू केला जाईल. या वाढीमुळे आता 46 टक्के असलेला महागाई भत्ता वाढून तो 50 टक्के झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घएण्यात आले. त्यानंतर पॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन पेंद्राच्या निर्णयाची माहिती दिली.
























































