हंटर किलर ‘वागशीर’, जानेवारीत नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक पाणबुडी, चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीन आणि पाकिस्तानचा सागरी धोका ओळखून हिंदुस्थान आपले नौदल सामर्थ्य वाढवत आहे. युद्धनौकांसोबतच अत्याधुनिक पाणबुडय़ांची निर्मिती करत आहे. याचाच भाग म्हणून जानेवारी 2025 मध्ये नौदलाच्या ताफ्यात नवी पाणबुडी दाखल होणार आहे. तिचे नाव ‘वागशीर’ आहे.

नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी ‘प्रोजेक्ट 75’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत 6 पाणबुडय़ा बनविल्या जाणार होत्या. ‘वागशीर’ ही त्यातली सहावी आणि अखेरची पाणबुडी आहे.

‘वागशीर’ आकाराने 221 फूट लांब आणि 40 फूट उंच आहे. तिचा वेग पाण्याखाली ताशी 35 किमी आणि पाण्यावर ताशी 20 किमी असेल. शत्रूची नजर चुकवून टॉरपीडो आणि अँटी शिप मिसाईलने हल्ला करू शकते. पाणबुडीवर एकाच वेळी 18 टॉरपिडो आणि अँटी शिप मिसाईल किंवा 20 पेक्षा जास्त माईन सज्ज ठेवू शकतो.

एन्टी सरफेस वॉरफेअर प्रणाली, एन्टी सबमरीन वॉरफेअर प्रणाली, इंटेलिजन्स गॅदरिंग, समुद्र भूसुरूंग पेरणे, एरिया सर्वेलन्स या प्रकारच्या आधुनिक यंत्रणांनी परिपूर्ण ही पाणबुडी आहे. यामुळे ही सर्वाधिक घातक अशी पाणबुडी झाली आहे.

काय आहे प्रोजेक्ट 75

नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी ‘प्रोजेक्ट 75’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत 6 पाणबुडय़ा बनविल्या जाणार आहेत. फ्रेंच नेव्हल डिफेन्स ऍण्ड एनर्जी कंपनीच्या (डीसीएनएस) आराखडय़ावर आधारलेल्या 6 पाणबुडय़ांची माझगाव डॉकमध्ये उभारणी करण्यात येत आहे. आयएनएस कलावरी ही या प्रकल्पातील पहिली पाणबुडी होती.  2017 साली आयएनएस कलावरी नौदलात दाखल झाली. त्यानंतर सप्टेंबर 2019 साली आयएनएस खांदेरी, मार्च 2021 मध्ये करंज, नोव्हेंबर 2021 मध्ये वेला आणि जानेवारी 2023 मध्ये वगीर पाणबुडय़ा नौदलाला मिळाल्या. आता सहावी म्हणजे वागशीर पाणबुडी जानेवारी 2025 मध्ये नौदलाला मिळेल.

n सध्या हिंदुस्थानकडे दोन बॅलेस्टिक मिसाईल न्यूक्लिअर पॉवर सबमरिन आहेत. तसेच दोन न्यूक्लियर अटॅक पाणबुड्यांनाही परवानगी मिळाली आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत हिंदुस्थानी नौदलाला तीन नव्या स्कॉर्पिन क्लास पाणबुड्या मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. नौदलाच्या ताफ्यातील 16 कन्वेन्शनल सबमरिनपैकी सात रशियन क्लासच्या, चार जर्मनीच्या आणि 5 फ्रेंच स्कॉर्पिन क्लासच्या सबमरिन आहेत.

शत्रूच्या रडारला चकका देण्याची ताकद या पाणबुडीमध्ये आहे. यात प्रगत सॉनिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान आहे. म्हणजे पाण्याकर चालताना तिचा आकाज येणार नाही. शत्रूने जास्त चलाखी केली तर घातक पद्धतीने हल्ला करण्याची ताकद यात आहे.