
सातारा जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठले आहे. परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी पसरणी गावातील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने हा फंडा वापरला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
झाले असे की, पसरणी गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी वाईतील किसन वीर महाविद्यालयात शिकतो. 15 फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा होती, मात्र त्याच दिवशी काही कामानिमित्त तो पाचगणी येथे गेला होता. तिथे भेटलेल्या ओळखीतील मुलाने त्याला आज परीक्षा असल्याची आठवण करून दिली. हातात वेळ होता फक्त अर्धा तास.
समर्थने वाईकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाली होती. आता आपण काही वेळेत पोहोचत नाही आणि परीक्षा बुडणार म्हणून समर्थला टेन्शन आले होते. पण पाचगणीत पॅराग्लायडिंग करणारे जीपी एडव्हेंचर्स ग्रुपचे गोविंद येवले यांनी समर्थची मदत करण्याचे ठरवले. त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत समर्थला पसरणीचा घाट पार करून दिला. समर्थ पॅराग्लायडिंग करत थेट कॉलेजला पोहोचला.
दरम्यान, समर्थ पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये पोहोचला आणि त्याने परीक्षाही दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या साहसाचे कौतुक होत आहे.
View this post on Instagram
7588638613