
अमेरिकेने जाहीर केले टॅरिफचे आज दर जाहीर केले आहे आणि केंद्र सरकार वक्फ बोर्डावर चर्चा करत आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच आतापर्यंत कुठल्याही सरकारवर अशी वेळ आली नव्हती असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
सोशल मीडियावर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, आजपासून अमेरिकेने जाहीर केलेले टॅरिफचे दर देशाला लागू होतील. यामुळे केंद्र सरकारला अमेरिकेवरच्या उत्पादनांवर कर कमी करावा लागणार आहे. आतापर्यंत कुठल्याही सरकारवर अशी वेळ आली नव्हती. या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ही बाब संपूर्ण देशाला सांगण्याऐवजी केंद्र सरकारने संसदेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक सादर केले आहे.
तसेच वक्फ बोर्डामुळे आता तुम्ही आणि मी यात व्यग्र झालो आहोत. आणि दुसरीकडे केंद्र सरकार देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था आणि पडलेल्या रुपयावरून जनतेच लक्ष दुसरीकडे वळवत आहे. राष्ट्रप्रथम म्हणणाऱ्या भाजपला देशाची थोडी जरा चिंता असती तर अर्थमंत्र्यांनी संसदेत यावर स्पष्टीकरण दिले असते. देशासंबंधित मुद्दे मांडण्याऐवजी केंद्र सरकारला विभाजित केलेला देशा हवाय.
































































