अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्य सरकारने 29 बालविवाह रोखले, महिला व बालकल्याण विभागाची माहिती

अक्षय्य तृतीयेचा मुहुर्त साधून राज्यात अनेक ठिकाणी बालविवाह होणार होते. पण राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करून हे विवाह रोखले आहे. महिला व बालविकास विभागाने राज्यातील 29 बालविवाह रोखले आहेत.महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या दिवशी अनेक मुहुर्त असतात त्यामुळे बालविवाह होतील ते रोखा असे आदेश त्यांनी दिले होते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिला व बालविकास विभागाने 16 जिल्ह्यातले 29 बालविवाह रोखले आहेत. यातील 11 विवाह हे मराठवाड्यात, 9 विदर्भातून तर दोन उत्तर महाराष्ट्र आणि दोन पश्चिम महाराष्ट्रात होणार होते.

आम्हाला महाराष्ट्र बालविवाहमुक्त करायचा आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यातील आमचे अधिकारी आणि कर्मचारी बुधवारी अलर्ट मोडवर असतात असे बोर्डीकर म्हणाल्या. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात बालविवाह लावणाऱ्यांना संदेश मिळेल असेही बोर्डीकर म्हणाल्या.