
पुण्यातील पौड येथील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरातील देवीच्या मूर्तीची न विटंबना झाल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 2) दुपारी समोर आला. त्यामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ गाव बंदची हाक दिली. पौड पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवसेना मुळशी तालुकाप्रमुख सचिन खैरे, युवा सेनेचे अविनाश बलकवडे, राम गायकवाड, ज्ञानेश्वर डफळ, सुप्रिया सरोसे, नामदेव टेमघरे, पांडुरंग निवेकर, नितीन साठे, प्रमोद बलकवडे, सचिन सावंत, मुकेश लोयरे, मिथुन खिलारी, नितीन लोयरे आदी उपस्थित होते. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, बाहेरून आलेल्या नागरिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे, तसेच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.