
128 वर्षाचे गुरु बाबा शिवानंद यांचे वाराणसीत निधन झाले आहे. गेल्या तीन दिवसांसापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबा शिवानंद यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगसाधनेसाठी समर्पित केले होते. 21 मार्च 2022 रोजी त्यांना हिंदुस्थान सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले होते. शिवानंद हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते.
बाबा शिवानंद वाराणसीच्या भेलूपुर भागात राहत होते. याच भागात त्यांचा आश्रमही होता. वाराणसीच्या हिरश्चंद्र घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.