
हिंदुस्थानच्या सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेश सिंदूर राबवत मोहीम फत्ते केली. मात्र, एवढ्यावरच हिंदुस्थान थांबणार नाही, असे संकेत मिळत आहेत. हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरने बिथरलेल्या पाकड्यांनी सीमेवर तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे. त्यात निष्पाप हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या हवाई दलाला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. काहीही संशयास्पद आढळून आल्यास पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या, असे हवाई दलाला सांगण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थानमधील 27 विमानतळं बंद करण्यात आली आहेत. त्यातील बहुतेक विमानतळं हे उत्तर आणि पश्चिमेतील आहेत जी पाकिस्तानच्या सीमेजवळ आहेत. त्यात श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर आणि लुधियाना या विमानतळांचाही समावेश आहे.
अजित डोवल अचानक पंतप्रधानांच्या निवासस्थानी
ऑरेशन सिंदूर मोहीम फत्ते झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे राजनैतिक आघाडीवर सक्रिय आहेत. अजित डोवल सकाळी अचाकन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवसस्थानी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे बैठक चालली. ज्यावेळी ही बैठक सुरू होती त्याचवेळी दुसरीकडे सर्वपक्षीय बैठकही सुरू होती.
Operation Sindoor Update – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; सर्वपक्षीय बैठकीनंतर हिंदुस्थानची गर्जना
अजित डोवल यांनी पंतप्रधानांना राजनैतिक आणि गुप्तचर यंत्रणेची सर्व माहिती सादर केली. ऑपरेशन सिंदूरनंतर बदलत्या परिस्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतरचा हा काळ हिंदुस्थानसाठी राजनैतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.