स्टेट बँकेच्या भरतीसाठी स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रशिक्षण वर्ग

स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाकरिता होणाऱ्या नोकरभरतीत मराठी भूमिपुत्रांची भरती होण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे ऑनलाईन, ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव -खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार या नोकरभरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.

n स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाकरिता नोकरभरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार https:// bank.Wi/web/careers/cureent – openings, Wi.co.in/web/careers/current-openings या संकेतस्थळावर 29 मेपूर्वी अर्ज करू शकतात. सदर नोकरभरतीत जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.