साऊथ इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

साऊथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर आणि बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 19 मे 2025 पासून सुरू केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 28 वर्षे असायला हवे. पदांसंबंधी सविस्तर माहिती वेबसाइट southindianbank.com वर देण्यात आली आहे.