आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक

ज्योती मल्होत्राचे प्रकरण ताजे असतानाच आता हरयाणातील नूंह येथून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. अरमान असे या गुप्तहेराचे नाव असून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. हरयाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी ही कारवाई केली. त्याच्याविरोधात देशद्रोहाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.