पाक सैनिकांसाठी प्रार्थना; व्हिडीओ शेअर केल्याने शिक्षिका निलंबित

मध्य प्रदेशातील सीहोर येथे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी महिला त्यांच्या सैनिकांसाठी प्रार्थना करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी येथील सरकारी शाळेतील शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शहनाज परवीन असे या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेने तिच्या फेसबुकवर ’अल्लाह, पाकिस्तानी सैनिकांचे रक्षण कर’ या मथळय़ासह एक व्हिडीओ पोस्ट केला होता.