12वी पास तरुणांना लष्करात जाण्याची संधी

हिंदुस्थानी लष्कराने 54 वी टेक्निकल एन्ट्री स्कीम (टीईएस-54) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. 12 वी विज्ञान उत्तीर्ण (पीसीएम) विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 19 वर्षे, 6 महिने असायला हवे. उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2006 ते 1 जुलै 2009 पर्यंतचा असायला हवा. 12 जून 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. केवळ अविवाहित पुरुष यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना मासिक 56 हजार 100 रुपये वेतन दिले जाणार आहे.