
मेट्रोचे प्रवासी आता उबर अॅपवरून त्यांचे तिकीट खरेदी करू शकतील. उबर कंपनीने सोमवारी अॅपवरून मेट्रोच्या तिकीट बुकिंगची घोषणा केली. सध्या दिल्ली मेट्रोपासून या सुविधेची सुरुवात झाली आहे. लवकरच देशभरातील अन्य तीन शहरांत ही सुविधा सुरू होईल. उबर कंपनीने सोमवारी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) समर्थित उबर अॅपवर मेट्रो तिकीट सेवा सुरू करण्यात येत असल्याचे घोषित केले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांशी जोडून घेणे आणि सार्वजनिक वाहतूक अधिक कनेक्टिव्ह बनवणे या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे उबर कंपनीने निवेदनात म्हटले आहे.